Gold Price: आज गौरी आगमन! करताय सोनं खरेदी? सणासुदीला घसरल्या किंमती; 1 तोळ्याचा भाव काय?

रोहिणी ठोंबरे

10 Sep 2024 (अपडेटेड: 10 Sep 2024, 06:00 PM)

Gold-Silver Price Today : आज जेष्ठा गौरी आगमन होणार आहे. यावेळी गौराईसाठी किंवा ओवसासाठी तुम्ही दागीने घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

गौराईसाठी किंवा ओवसासाठी तुम्ही दागीने घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खास बातमी

point

देशात सोन्याचा भाव 72,000 रुपयांहून अधिक आहे.

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Price Today : आज जेष्ठा गौरी आगमन होणार आहे. यावेळी गौराईसाठी किंवा ओवसासाठी तुम्ही दागीने घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. देशात सोन्याचा भाव 72,000 रुपयांहून अधिक आहे. शनिवार 7 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीच्या सणानिमित्ताने सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली. अशावेळी आज (10 सप्टेंबर) थोडं का होईना सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळे आजचे भाव जाणून घेऊया. (gold-silver prices on 10 september 2024 ganpati festival in maharashtra mumbai know the details)

हे वाचलं का?

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (9 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 72, 870 रूपये होता. आज यामध्ये 30 रूपयांनी घट झाली असून 72, 840 रूपये किंमत आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,770 रूपये आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 85,000 रूपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : Maharashtra Weather: गौराईच्या आगमनाला पावसाची हजेरी? पाहा आजचा IMD चा अंदाज

आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. आता लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते सणासुदीच्या काळात सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतं.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,770 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 840 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,630 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,770 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 840 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,630 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,770 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 840 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,630 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,800 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,890 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,680 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Big Boss Marathi 5: जान्हवीमुळे झालं 3568 रुपयांचं नुकसान! चाहत्याने केली पैशांची मागणी; नेमकं घडलं काय?

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

 

    follow whatsapp