Gold-Silver Prices: सोनं झालं स्वस्त! अन् चांदी... तुमच्या शहरातील आजचा भाव काय?  

रोहिणी ठोंबरे

• 05:51 PM • 20 Aug 2024

Gold Price Todays : आज (20 ऑगस्ट) सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? मग, तुमच्यासाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. कारण, कालच्या तुलनेत (19 ऑगस्ट) आज सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

आज सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली आहे.

point

24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा किंतीत 120 रूपयांनी घट झाली आहे.

Gold Price Todays : आज (20 ऑगस्ट) सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? मग, तुमच्यासाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. कारण, कालच्या तुलनेत (19 ऑगस्ट) आज सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली आहे. 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा किंतीत 120 रूपयांनी घट झाली आहे. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (gold-silver prices today 20th august gold rate in mumbai pune for 10 gram know the details about it

हे वाचलं का?

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (19 ऑगस्ट 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 72, 770 रूपये होता. पण आज यामध्ये 120 रूपयांनी घट झाली असून तो 72, 650 रूपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांनी घसरण झाली आहे तर, 18 कॅरेट सोन्याच्या भावात 80 रूपयांनी घट झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भाव गगनाला भिडला आहे. एक किलो चांदीची किंमत आज (20 ऑगस्ट) 1,100 रूपयांनी वाढली असून 87,000 इतकी झाली आहे. 

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 650 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 490 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 650 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 490 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 650 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 490 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 630 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 680 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 520 रूपये आहे.

हेही वाचा : Badlapur Crime: मंत्री गिरीश महाजन बदलापूर स्टेशनवर आले अन्... वाचा जे घडलं ते!

 22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Badlapur Thane School case : 'फाशी... फाशी..' 7 तास बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर, एक इंचही मागे हटायला नाही तयार!

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp