2000 notes : 30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटांचं काय होणार? शक्तिकांत दास म्हणाले…

मुंबई तक

22 May 2023 (अपडेटेड: 22 May 2023, 10:21 AM)

30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांच्या नोटांचे काय होईल? शक्तिकांता दास म्हणाले की, ’30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर राहतील, असे आम्ही काहीही म्हटलेले नाही.’

RBI Governor Shaktikanta Das : why has The Reserve Bank of India (RBI) has decided to withdraw Rs 2,000 denomination banknotes from circulation.

RBI Governor Shaktikanta Das : why has The Reserve Bank of India (RBI) has decided to withdraw Rs 2,000 denomination banknotes from circulation.

follow google news

Why RBI withdraws 2000 note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटबंदीनंतर चलनात आणलेली 2000 हजाराची नोट परत घेण्याचा निर्णय घेतला. 23 मे पासून नोटा परत करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, बँका 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी तयार आहेत. बँकांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नोटा बदलण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. चार महिन्यांचा कालावधी असल्याने सोयीनुसार नोटा बदलून घ्याव्यात, असंही ते म्हणाले.

हे वाचलं का?

30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटांचे काय होईल?

दास पुढे म्हणाले, नोटा बदलून देण्याच्या या प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. याचवेळी शक्तिकांत दास यांना विचारण्यात आले की, 30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांच्या नोटांचे काय होईल? त्यावर ते म्हणाले की, ’30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर राहतील, असे आम्ही काहीही म्हटलेले नाही.’

जास्तीत जास्त नोटा परत येणे अपेक्षित

दास म्हणाले की, ‘आम्हाला आशा आहे की, 30 सप्टेंबरच्या आत 2000 रुपयांच्या जास्तीत जास्त नोटा परत येतील. त्यानंतरही या नोटा बाजारात शिल्लक राहिल्या, तर त्याची पुढील माहिती दिली जाईल. म्हणजेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, लोकांनी 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलून घ्याव्यात.

हेही वाचा >> 2000 note, SBI : ना ओळखपत्र, ना फॉर्मची गरज; 2000 च्या नोटा कशा बदलायच्या?

शक्तिकांता दास म्हणाले की, 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची तारीख निश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून लोकांनी ती गांभीर्याने घ्यावी. अन्यथा ही एक कधीही न संपणारी प्रक्रिया बनली असती.

हेही वाचा >> Aryan Khan drugs case : समीर वानखेडेंचा 25 कोटी खंडणीचा डाव एका फोटोने उधळला! वाचा इनसाईड स्टोरी

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये आहे. पण जर एखाद्याला त्याच्या बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करायच्या असतील तर त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

क्लीन नोट पॉलिसी…

भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत 2000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणांतर्गत RBI हळूहळू बाजारातून 2000 च्या नोटा काढून घेणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या 3.62 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत. पण व्यवहार खूपच कमी होत आहेत. ‘क्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत बँक वेळोवेळी अशी पावले उचलत आहे.

मूलभूत सुविधा पुरवण्याचे बँकांना निर्देश

उन्हाळा असल्याचे लक्षात घेऊन बँकांनी नागरिकांना काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आरबीआयने म्हटले आहे. बँकांना उन्हाळा लक्षात घेऊन शाखेत सावली असलेल्या प्रतिक्षा कक्षाची व्यवस्था करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय पिण्याच्या पाण्याची सुविधेसह इतर आवश्यक मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात.

    follow whatsapp