Govt Job: 12 उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी! CISF मध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरू

रोहिणी ठोंबरे

• 01:29 PM • 29 Aug 2024

Job Vacancy 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत आहे. कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) या पदावर एकूण 1 हजार 130 जागांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job Recruitment 2024 in Central Industrial Security Force know how much is salary Who can apply )

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, सायन्समधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Gold Price Today: बापरे! सणासुदीला सोन्याच्या किंमतीत भडका; आज 1 तोळ्याची किंमत किती?

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • तर, एससी/ एसटी/ इएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे.

अधिक माहितीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.cisf.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

हेही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार! वाचा IMD चा आजचा अंदाज

अर्जाची लिंक

https://cisfrectt.cisf.gov.in/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1HBnfEm67xrB7xE-BUwN2EeWA7JR-ygZ0/view?usp=sharing

    follow whatsapp