Hasan Mushrif : अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुसंख्य नेते भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. भाजपकडून दबाब टाकल्यामुळे अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला, असे दावे शरद पवार आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी केले. पण, आता हसन मुश्रीफ यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय खळबळ उडाली असून, विरोधकांना आयते शस्त्र मिळालं आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूरमधील बिद्री साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. सध्या कारखान्याची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के.पी. पाटील यांच्या हातात आहे. त्यांना मुश्रीफ गटाचा पाठिंबा आहे.
हे ही वाचा >> भाजपने काय दिली होती ‘ऑफर’?; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात भूकंप
बिद्री कारखान्याच्या राजकारणात पाटील यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर आहेत. आबिटकर यांना भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांचा पाठिंबा आहे. त्यांच्या पाठिंब्याच्या संदर्भानेच हसन मुश्रीफ यांनी विधान केले.
हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
बिद्री साखर कारखान्याची निवडणूक लागली असून, प्रचार सुरू झाला आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याचे वातावरण तापले असून, एका प्रचार सभेत बोलताना हसन मुश्रीफ यांनी एक विधान केले. मुश्रीफ म्हणाले, “या निवडणुकीत भाजप आपल्याबरोबर येईल, असे वाटत नाही. कारण तेच मला तुरुंगात घालायला निघाले होते”, असं मुश्रीफ म्हणाले.
शरद पवारांनी काय केला होता दावा?
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत बोलताना शरद पवारांनी भाजपकडून आलेल्या ऑफरचा खुलासा केला होता. पवार म्हणाले होते की, “महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं, तर आठ लोकांना त्यांनी (भाजप) मंत्रिमंडळात सामावून घेतलं. मी स्पष्ट सांगू इच्छितो की, सर्व आठ लोक मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या एक महिनाआधी मला भेटायला आले होते. त्यांनी हे सांगितलं की, आमच्याविरुद्ध ईडीची कारवाई सुरु होत आहे. यातून मार्ग काढा.”
हे ही वाचा >> Hasan Mushrif : कार्यकर्ता ते कोल्हापुरमधील राष्ट्रवादीचा चेहरा… हसन मुश्रीफ कोण आहेत?
पुढे पवार असंही म्हणाले होते की, “ते म्हणाले की आम्हाला हे सांगितलं गेलं की तुम्ही आणि तुमची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देण्यास तयार असतील, तुमच्याविरुद्ध काहीही होणार नाही. पण, तुम्ही आला नाहीत, तर तुमच्याविरुद्ध कारवाई होईल. त्यामुळे इकडे यायचं की तिकडे राहायचं, हे तुम्हाला ठरवायचं आहे.”
ADVERTISEMENT