Hit And Run : केंद्र सरकारने लागू केलेल्या भारतीय न्याय संहितेतील हिट अँड रनच्या तरतुदींना देशभरातून तीव्र विरोध केला जात आहे. त्या हिट अँड रन प्रकरणांच्या नव्या कायद्याबाबत (New Law) आता सरकार (Government) आणि वाहतूकदार यांच्यामध्ये समझोता झाल्याचे सांगण्यात आले आहे. परिवहन संघटनेकडून देशभरातील चालकांना संप मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, सध्या या कायद्याची अंमलबजावणी होणार नसून ज्यावेळी त्याची अंमलबजावणी करण्यात येईल त्यावेळी संघटनेशी चर्चा केली जाणार असल्याचे अश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आता ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (All India Motor Transport Congress) देशातील चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT
नव्या कायद्याला विरोध
मोटर वाहन कायद्यांतर्गत हिट-अँड-रन प्रकरणांसाठी नवीन कायद्याला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे देशातील मोठ्या वाहनांचे चालक संपावर असून रस्ते अडवून कायद्याची अंमलबजावणी करू नये अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्याबरोबर गृह मंत्रालयात परिवहन संघटनेची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांना आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने संप मागे घेण्याचे मान्य केले.
संप मागे घ्या
हिट अँड रन प्रकरणाबात बोलताना ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे चेअरमन मलकित सिंग बल यांनी सांगितले की, 106 (2) ज्यामध्ये 10 वर्षांची शिक्षा आणि दंड करण्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र हा कायदा आम्ही लागू होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, नव्या कायद्यात 10 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अजून या गोष्टीची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे आता त्याविरोधात आम्ही आवाज उठवला असून भविष्यात या कायद्याची अंमलबजावणी होणार नसल्याचे अश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे संप मागे घ्यावा असं आवाहन संघटनेतर्फे करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा >> आधी नग्न केलं, मग धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं, थरारक घटनेत कसा वाचला महिलेचा जीव?
कायदा लागू नाही
मलकित सिंग बल यांनी सांगितले की, या नव्या कायद्याबाबत आम्ही चर्चा केली आहे. त्यामुळे आमच्या सध्याच्या प्रश्नांचे आणि समस्यांचे निराकरण झाले आहे. सरकारने नवा कायदा केला असला तरी अजून त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे हा कायदा लागू करण्यापूर्वी आता ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा सल्ला घेतला जाणार असल्याचे अश्वासन मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
संघटनेबरोबरच चर्चा
तसेच केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्याकडून सांगण्यात आले की, 10 वर्षांची शिक्षा ठोठावणाऱ्या कायद्याबाबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसबरोबर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करताना संघटनेबरोबर चर्चा करूनच त्याची अंमलबजावणी केली जाईल असंही त्यांनी सांगितले.
चालक नव्हे सैनिक
हिट अँड रन कायद्याविरोधात देशभरातील चालक रस्त्यावर उतरून त्यांच्याकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यामुळे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृत लाल मदन यांनी चालकांचे आभार मानत तुम्ही फक्त चालक नाही तर तुम्ही आमचे सैनिक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तुमची कोणतीच गैरसोय होऊ नये ही संघटनेची इच्छा असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी या कायद्याला स्थगित दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT