खोपोली: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती तेव्हा अचानक चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला. सध्या बसमधील 16 जखमी प्रवाशांना बाहेर काढलं असून त्यांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इतरही प्रवासी बसमध्ये अद्यापही अडकलेले असून बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (horrific accident on old pune mumbai highway uncontrolled bus fell into 500 feet deep gorge 13 killed)
ADVERTISEMENT
नेमका अपघात कसा घडला?
लोणावळ्याजवळील खोपोली येथे आज (15 मार्च) पहाटे 4 वाजेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक बस अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली. ज्यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती तेव्हा अचानक चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला. सध्या बसमधील 16 जखमी प्रवाशांना बाहेर काढलं असून त्यांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इतरही प्रवासी बसमध्ये अद्यापही अडकलेले असून बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अधिक वाचा – Viral Video : बिकिनी, कपल किस आणि पेपर स्प्रे …या घटनांनमुळे दिल्ली मेट्रोत सापडली वादात
दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणावळ्याजवळील खंडाळा घाट परिसरातील शिंगरोबा मंदिराजवळ ही घटना घडली. येथून जाणारी बस बाजूचा अडथळा तोडून थेट 500 फूट खोल दरीत कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिक वाचा – डेअरीमध्ये भीषण स्फोट अन् आगीचे तांडव; तब्बल 18 हजार गायींचा होरपळून मृत्यू
दरम्यान, या बसमध्ये नेमके किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी क्रेन आणि रुग्णवाहिका मागवून बचावकार्य सुरू केले. तसेच काही ट्रेकर्सच्या मदतीने जखमींना वर आणण्याचे कामही तात्काळ सुरू करण्यात आले आहे.
अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना बाहेर काढण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी क्रेन मागवण्यात आली असून, जखमींना घेण्यासाठी रुग्णवाहिकाही पोहोचली आहे.
अधिक वाचा – साताऱ्यातील जवानाचा संशयास्पद मृत्यू, पंजाबमधील सैन्य तळावर नेमकं काय घडलं?
रायगड एसपींनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, ‘खोपोली परिसरात बस दरीत कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे.’
ADVERTISEMENT