Maharashtra HSC Result 2023: बारावीचा निकाल अवघ्या काही तासात, पण…

मुंबई तक

25 May 2023 (अपडेटेड: 25 May 2023, 08:38 AM)

Maharashtra Board Result 2023 live: बारावीचा ऑनलाइन निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे. पण त्याआधी निकालाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी जरूर जाणून घ्या.

Maharashtra HSC: 12th online result will be declared on 25 may 2023 at 2 pm know important things about the result

Maharashtra HSC: 12th online result will be declared on 25 may 2023 at 2 pm know important things about the result

follow google news

Maharashtra Board Result 2023: मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डाने बारावीचा निकाल (Maharashtra board HSC result 2021) आज (25 मे) जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा नेमका निकाल आणि विभागवार निकाल बोर्डाने जाहीर केला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना त्यांचा नेमका निकाल हा दुपारी 2 वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे आता या निकालासाठी अवघे काही तास उरले असून विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधी बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालांची विभागवार माहिती देण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाईल. (hsc 12th online result will be declared on 25 may 2023 at 2 pm know important things about the result)

हे वाचलं का?

बारावीच्या विद्यार्थ्यांना पाहता येणार ऑनलाइन निकाल:

www.maharashtraeducation.com आणि www.examresults.net/maharashtra या दोन वेबसाइटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल पाहता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे.

HSC Result 2023: विभागानुसार निकाल

  1. कोकण – 96.01 टक्के
  2. पुणे – 93.34 टक्के
  3. कोल्हापूर – 93.28 टक्के
  4. अमरावती – 92.75 टक्के
  5. छत्रपती संभाजीनगर – 91.85 टक्के
  6. नाशिक – 91.66 टक्के
  7. लातूर – 90.37 टक्के
  8. नागपूर – 90.35 टक्के
  9. मुबंई – 88.13 टक्के

बारावीच्या निकालात मुलींची बाजी

बारावीच्या निकालात यंदाही नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. यावेळी राज्यात मुलींचा निकाल हा 93.73 टक्के लागला असून मुलांचा निकाल हा 89.14 टक्के इतका लागला आहे. अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

    follow whatsapp