IAS Officer Tukaram mundhe : राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या असून, यात तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. कार्य पद्धतीमुळे चर्चेत राहणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यात तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून, गेल्या काही महिन्यांपासून कृषी विभाग गैरप्रकारांमुळे चर्चेत आहे. त्यातच आता मुंढेंची बदल झाल्याने या विभागाला शिस्त लागू शकते, अशी चर्चा सुरू झालीये. (IAS Officer Tukaram mundhe transferred in agriculture and ADF department)
ADVERTISEMENT
पूर्वीचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या काळात कृषी विभाग राज्यात चर्चेत राहिला. एकीकडे बोगस बियाणांचे प्रकार, तर दुसरीकडे बोगस पथकांचे छापे असे प्रकार घडल्यानंतर विरोधकांकडून या विभागाला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे.
वाचा >> Kalyan: ‘नात माझ्याकडून सटकली अन् नाल्यात…’, ‘तेव्हा’ काय घडलं आजोबांनी सांगितलं!
चालू अधिवेशनातही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी कृषी विभागातील गैरप्रकारांवर बोट ठेवत कृषी मंत्र्यांना सवाल केले होते. “खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. यामध्ये खासगी, सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खते सक्तीने दिली जात आहेत. शेतकरी आणि संस्था वाचवण्यासाठी सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा”, अशी मागणी बाळासाहेब थोरातांनी केली होती.
वाचा >> अजित पवार उपमुख्यमंत्री होताच 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या? तुमचे नवे जिल्हाधिकारी कोण?
मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते आले असून, आता तुकाराम मुंढे यांच्यावर कृषी आणि पशुसंवर्धन विभागात सचिव (अतिरिक्त) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे हे मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी कार्यरत होते. आता त्यांची बदली केली गेली आहे. पण, त्यांच्या बदल्यांचा इतिहास पाहता सरकार त्यांना या विभागात किती दिवस ठेवेल, याबद्दल सांशकताही व्यक्त केली जात आहे.
दीड महिन्यांपूर्वी करण्यात आली होती बदली
तुकाराम मुंढे यांची दीड महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने बदली केली होती. त्यानंतर लगेच त्यांना दुसऱ्या विभागात पाठवण्यात आलं आहे. तुकाराम मुंढे यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणूनही काम पाहिलेलं आहे. नागपर महापालिकेचे आयुक्त असताना बराच वादंग निर्माण झाला होता. त्यानंतरही त्यांची बदली करण्यात आली होती.
ADVERTISEMENT