Maharashtra Weather : मुंबईसह 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार हैदोस! IMD चा इशारा

मुंबई तक

22 Jul 2024 (अपडेटेड: 22 Jul 2024, 08:33 AM)

Mumbai Weather : मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती, गडचिरोली, नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हैदोस घालण्याचा अंदाज आहे. 22 जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून, हवामान विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

point

मुंबई वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज

point

प्रशासनाकडून मुंबईकरांना घरात राहण्याचे आवाहन

Maharashtra Mumbai Weather Forecast : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे. पुढील २४ तासांत राज्यातील काही भागांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबई वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Forecast including Mumbai, Pune, Thane, Nagpur, Kolhapur)

हे वाचलं का?

मुंबईला इशारा, अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईत सोमवारीही (22 जुलै) पाऊस धुमाकूळ घालण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याचा अंदाज असून, अतिमुसळधार पाऊस होईल. सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. 

हेही वाचा >> ''विधानसभा महायुतीत लढू, पण...'', अजित पवारांचा कार्यकर्त्यांना ‘मेसेज’

कोकणाला ऑरेंज अलर्ट

कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. त्याचबरोबर सातारा, भंडारा जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

हेही वाचा >> ठाकरे-पवारांवर शाहांचा सर्वात मोठा हल्ला! भाजपची विधानसभेची ‘लाईन’ ठरली?

राजधानी मुंबईसह महाराष्टातील कोणत्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, ठाणे या जिल्ह्यांसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

    follow whatsapp