Gold Price: सोन्याचे वाढले भाव, एका तोळ्यासाठी किती पैसे द्यावे लागणार?

रोहिणी ठोंबरे

03 Sep 2023 (अपडेटेड: 03 Sep 2023, 07:03 AM)

सलग दुसऱ्या आठवड्यातही सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. अनेक आठवड्यांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत (Gold Rate Hike) वाढ नोंदवली जात आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 59,312 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​थांबला.

sale_of_gold_jewellery-sixteen_nine-4

sale_of_gold_jewellery-sixteen_nine-4

follow google news

Weekly Gold Price : सलग दुसऱ्या आठवड्यातही सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. अनेक आठवड्यांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत (Gold Rate Hike) वाढ नोंदवली जात आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 59,312 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​थांबला. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव 58,670 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून तो पुन्हा एकदा 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा आकडा गाठत आहे. (Increased gold prices how much to pay for 10 grams)

हे वाचलं का?

जुलैमध्ये सोन्याचा भाव 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहोचला होता. पण नंतर किंमती खाली येऊ लागल्या आणि आता ते 59,000 रुपयांच्या रेंजमध्ये दिसत आहेत.

Sanjay Raut :’…तो अदृश्य फोन कोणाचा ?’; राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

‘या’ आठवड्यात कसा होता सोन्याचा दर?

माहितीनुसार, या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी सोन्याचा भाव 58,730 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मंगळवारी किंमतीत किंचित वाढ झाली आणि ती 58,898 वर पोहोचली. बुधवारी किंमत आणखी वाढून 59,267 रुपये झाली. गुरुवारी सोन्याचा भाव 59,374 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. शुक्रवारी, दर 59,312 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​थांबली.

Pratyusha banerjee Suicide : “माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या केलीये”

सोने किती महागले?

गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 58,670 रुपये होता. अशाप्रकारे या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 642 रुपयांनी वाढ झाली आहे. या आठवड्यात सोमवारी सोने 58,730 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकले गेले आणि गुरुवारी सर्वात महाग 59,374 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले गेले.

24 कॅरेट सोन्याची किंमत

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 1 सप्टेंबर 2023 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत कमाल 59,489 रुपये होती. तर 22 कॅरेट सोने 59,251 रुपयांना विकले गेले. सर्व प्रकारचे सोन्याचे दर कराशिवाय मोजले गेले आहेत. सोन्यावरील जीएसटी शुल्क वेगळे भरावे लागते. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किंमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणित किंमतीची माहिती देतात.

INDIA@100: आरोग्य आणि भारताचं भविष्य.. नव्या युगाची सुरुवात

एप्रिल ते जून या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत घट झाली होती. देशातील सोन्याच्या मागणीत घट होण्याचे कारण म्हणजे चढे भाव. जूनच्या तिमाहीत सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला होता.

    follow whatsapp