Tikaram Meena Death: मुंबई: जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये (Jaipur-Mumbai Train) सोमवारी (31 जुलै) पालघर (Palghar) स्टेशनजवळ अंदाधुंद गोळीबार झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या आरपीएफ (RPF)कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. या अपघातात आरपीएफचा एएसआय (ASI) आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. ज्यानंतर संपूर्ण ट्रेनमध्ये एकच खळबळ माजली. यावेळी प्रत्येक प्रवाशाचा मृत्यूच्या भीतीने थरकाप उडाला होता. यामधील मृत पोलीस अधिकारी दादरमधील आरपीएफमध्ये तैनात असल्याचं आता समोर आलं आहे. (jaipur mumbai express firing accused chetan police officer tikaram meena who died in the firing was posted in dadar rpf breaking news in marathi online)
ADVERTISEMENT
मुंबईपासून जवळच असलेल्या पालघरमध्ये ही घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कॉन्स्टेबल चेतन सिंग (chetan singh) हा मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. चालत्या ट्रेनमध्ये चेतनने अचानक ASI टिकाराम यांच्यावर गोळीबार केला. यानंतर चेतन दुसऱ्या बोगीत गेला, तिथे त्याने तीन प्रवाशांवर गोळीबार केला. यामध्ये एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोपी कॉन्स्टेबल चेतनने चौघांचा जीन घेतला अन्…
कॉन्स्टेबल चेतनने चौघांची हत्या करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांची हत्या केल्यानंतर त्याने साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि मीरा रोडजवळ ट्रेनमधून उडी मारली. मात्र, नंतर त्याला जीआरपीच्या जवानांनी शस्त्रासह अटक केली.
मृत ASI टिकाराम हे दादर आरपीएफमध्ये होते तैनात
आरोपी चेतन हा मुंबई सेंट्रल आरपीएफमध्ये तैनात होता. तो मूळचा हाथरसचा रहिवासी आहे. यापूर्वी त्याची पोस्टिंग गुजरातमध्ये होती. नुकतीच त्याची मुंबईला बदली झाली होती. तर दुसरीकडे मृत एएसआय टिकाराम हे दादर आरपीएफमध्ये तैनात होते. ते राजस्थानमधील सवाई माधोपूरचा रहिवासी होते.
हा व्हिडीओ पाहा >> रागाच्या भरात त्याने धावत्या ट्रेनमध्ये चालवल्या गोळ्या, चोघांचा मृत्यू
आरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक एक्सप्रेस ट्रेनमध्ये एस्कॉर्टसाठी एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन जवान नेहमीच तैनात असतात. ते रेल्वेतूनच प्रवास करत असतात. आरोपी चेतन हा रविवारी एका ट्रेनला एस्कॉर्ट करत सुरत रेल्वे स्टेशनवर आला येथे त्याने काही तास विश्रांती घेतली. यानंतर तो सुरत रेल्वे स्थानकावरून जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चढला. इथे त्याच्यासोबत आणखी दोन हवालदार होते. तर एएसआय टिकाराम या सर्वांचे नेतृत्व करत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर चेतनने गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्याने साखळी ओढून ट्रेनमधून उडी मारली. मात्र, त्याला आरपीएफच्या जवानांनी अटक केली.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चारही जणांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एवढेच नाही तर चेतनसोबत तैनात असलेल्या दोन्ही कॉन्स्टेबलचीही चौकशी करण्यात आली आहे.
AKM बंदुकीतून गोळीबार
आरोपी चेतनने त्याच्या सर्व्हिस गन AKM मधून गोळीबार केला. ही AK 47 ची सुधारित आवृत्ती आहे. आरोपीने ट्रेनमध्ये तीन ठिकाणी गोळीबार केला. त्याने बी5 कोचमधील दोन जणांना गोळ्या घातल्या. तर एक पॅन्ट्रीमध्ये आणि एकाला एस 6 मध्ये गोळी झाडली.
हे ही वाचा >> Jaipur Mumbai Train Firing : जवानाने चौघांवर गोळ्या का झाडल्या? ते लोक कोण?
डीआरएम नीरज कुमार यांनी सांगितले की, आरोपी चेतनला बोरिवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. जिथे त्याची सतत चौकशी केली जात आहे. गोळीबाराचे कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.
ADVERTISEMENT