Kalwa Hospital: डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे 27 जणांनी गमावले प्राण?

मिथिलेश गुप्ता

• 02:33 PM • 14 Aug 2023

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

kalwa hospital 27 people lost their lives due to negligence of doctors and nurses breaking news in marathi online

kalwa hospital 27 people lost their lives due to negligence of doctors and nurses breaking news in marathi online

follow google news

Kalwa Hospital Deaths: कळवा: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराअभावी 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू (27 Patient Death)झाल्याची अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. यामध्ये डोंबिवलीतील राहणाऱ्या ललिताबाई शंकर चव्हाण (वय 42 वर्ष ) आणि कल्याणमध्ये राहणारे निनाद रमेश लोकूर (वय 52 वर्ष) यांचा कळवा येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्स यांच्या निष्काळजीपणामुळेच मृत्यू झाला. असे आरोप करण्यात येत आहे. (kalwa hospital 27 people lost their lives due to negligence of doctors and nurses breaking news in marathi online)

हे वाचलं का?

डोंबिवली पूर्वेतील टाटा पॉवर लाईन येथील महात्मा गांधी नगर येथे राहणाऱ्या ललिताबाई शंकर चव्हाण (वय 42) यांचा समावेश आहे. आठवडाभरापूर्वी ललिताबाई यांना जुलाब, अस्वस्थपणा आणि उलटीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना 9 ऑगस्ट रोजी दुपारी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कळवा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी ललिताबाई यांना दाखल करून घेतले. मात्र त्यांची कळवा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्स यांनी योग्य काळजी न घेतल्याने ललिताबाई चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप नातेवाईक पवार यांनी केला आहे.

हे ही वाचा >> Sharad Pawar Ajit Pawar meet : ‘तुम्ही माझं ऐकत नाही’, ‘त्या’ भेटीनंतर राज ठाकरेंचं मोठं भाकित

तर दुसरीकडे कल्याण येथील राहणारे निनाद रमेश लोकूर यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्या प्लेटलेट्सचे प्रमाण हे 6 हजारावर पोहोचले होते. 12 ऑगस्ट रोजी त्यांना कल्याणच्या रूक्‍मिणीबाई रूग्णालयात दाखल करण्यासाठी गेले असता, डॉक्टरांनी त्यांना कळव्याच्या शासकीय रुग्णालयात किंवा मुंबईच्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. नातेवाईकांनी निनाद लोकूर यांना रात्री एक वाजता महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं. मात्र, मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

निनाद यांचे भाऊ निरंजन लोकूर यांनी सांगितले की, ‘आम्हाला वाटले की आमचा भाऊ बरा होईल, पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. जर आम्ही थोडं आधी हॉस्पिटलला पोहचलो असतो तर कदाचित वाचला असता. तसेच कल्याणच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी सुविधांचा अभाव आहे त्यामुळे शासकीय रुग्णालयात सुविधा वाढवली पाहिजे.’ असं म्हणत त्यांनी वैद्यकीय सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

कळवा रुग्णालयात आजही 4 रुग्णांचा मृत्यू

दरम्यान, आज (14 ऑगस्ट) देखील कळवा रुग्णलयात आणखी 4 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंत या रुग्णालयातील एकूण 27 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

हे ही वाचा >> Mumbai Tak AI Anchor: ‘मी सायली…’, मराठी मीडियातील पहिलीवहिली AI न्यूज अँकर!

कळवा रुग्णालयात आज मृत पावलेल्या रुग्णांची नावे…

1. योगेश विजय जाधव – वय 35

2. अंश राकेश निवारी – (वय 4 वर्षे, रा. दिवा)

3. माही हनुमान दास – (वय 1 महिना, रा. भिवंडी)

4. राजेंद्र विठोबाजी भाकरे- (वय 51, रा. कळवा)

    follow whatsapp