Marathi News Breaking: कोल्हापूर: सोशल मीडियावरील (Social Media) एका वादग्रस्त स्टेट्समुळे कोल्हापुरातील (Kolhapur) वातावरण हे प्रचंड तणावाचं झालं होतं. शहरातील काही भागात दगडफेकीच्या (Stone Pelting) घटना देखील घडल्या. त्यामुळे पोलिसांना (Kolhapur Police) आंदोलकांवर लाठीहल्ला देखील करावा लागला. तसंच अश्रूधूराच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या. या सगळ्या परिस्थितीबाबत आता जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. (kolhapur violence hindutvavadi organizations stone pelting District Collector violators restraining order will be punished)
ADVERTISEMENT
सध्या संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावे. नागरिकांनी सोशल मीडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
‘कोणाचीही गय केली जाणार नाही…’
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन कोल्हापूर शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची पाहणी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. या पाहणी नंतर कोल्हापूरांना आवाहन करताना ते म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच सर्वधर्मसमभावाचा आणि प्रगतशील जिल्हा राहिला आहे. शाहू महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेवून आजवर कोल्हापूर जिल्ह्याने जगाला पुरोगामी आणि आधुनिकतेचा विचार दिला आहे. जगाला आदर्श विचार देणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. कोल्हापूरचा सामाजिक क्षेत्रातील ठसा कायम राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन करुन प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.’ असे जिल्हादंडाधिकारी रेखावार यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूरकर एवढे हिंसक झाले?
कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाविषयी व्हॉट्सअॅप स्टेटसला पोस्ट ठेवली होती. या पोस्टवरून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांच्या जमावाने लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्याच्या दारात गर्दी केली. त्यानंतर घोषणाबाजी केली. हा जमाव शहरातील टाऊन हॉल, बिंदू चौक, लक्ष्मी मंडई, अकबर मोहल्ला, मुस्लिम बोर्डिंग, सीसीआर रुग्णालय परिसरात गेला. तिथे दुकान, हातगाड्या आणि घरांवर जमावाने दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला.
हे ही वाचा >> Mumbai : “ती म्हणायची सुरक्षारक्षकाची भीती वाटते”, ‘त्या’ तरुणीने वडिलांना काय सांगितलं होतं?
काल (6 जून) झालेल्या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानंतर आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक इथे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र या आंदोलन सुरू केलं. लव्ह जिहाद विरोधी घोषणा देत हिंदुत्वादी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्याला आला आहे.
हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर हिंसक झालेल्या जमावाने दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या.
हे ही वाचा >> Mumbai : “ती म्हणायची सुरक्षारक्षकाची भीती वाटते”, ‘त्या’ तरुणीने वडिलांना काय सांगितलं होतं?
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून (7 जून) बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. आजपासून (7 जून) 19 जूनपर्यंत जमावबंदी (पाचपेक्षा अधिक लोक जमा होणे), मिरवणुका काढणे बेकायदा जमाव जमवणे तसेच सभा घेण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
ADVERTISEMENT