स्मिता शिंदे, नारायणगाव, जुन्नर: ‘इथून पुढची सगळी युद्ध ही पाण्याच्या प्रश्नावर होणार असून त्याची सुरवात पुण्यातून होणार’, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी दिला आहे. कुकडीचे (Kukadi) पाणी नगरचे भाजपचे (BJP) मंत्री पळवत असल्याने वळसे-पाटील हे आज (23 जून) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जुन्नर (Junnar) तालुक्यातील नारायणगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. (kukadi river junnar narayangaon ncp dilip walse patil farmer march bjp minister)
ADVERTISEMENT
‘वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावं लागलं, संघर्ष करावा लागला आणि पोलिसांनी भले आम्हाला अटक करू दे, नाहीतर आम्हाला छातीवर गोळ्या मारू देत.. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून आम्ही सरकारला असा वेडा वाकडा निर्णय घेऊ देणार नाही असंही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
नगर जिल्ह्यातील मंत्री कुकडी प्रकल्पातील पाणी नगर जिल्हयात पळवत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आज दुपारी वळसे पाटील यांनी थेट सरकारला इशारा देत कुकडी प्रकल्पाच्या नारायणगाव येथील कार्यालयावर जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
हे ही वाचा>> Pune, MPSC: राहुलसोबत लग्नाला नकार, दर्शना पवारच्या कुटुंबीयांनी नव्हे तर…
मात्र कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यादरम्यान कार्यालयात उपस्थित नसल्याने चिडलेल्या वळसे पाटील यांनी अखेर निवेदन देऊन संताप व्यक्त केला. या दरम्यान वळसे पाटील यांनी थेट सरकारला आणि अधिकाऱ्यांना इशारा दिला की, पाणी सोडले तर आम्ही रस्त्यावर उतरु आणि वेळप्रसंगी दोन हात करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही.
मान्सून लांबल्याने महाराष्ट्रात पाणीटंचाई
दुसरीकडे यंदा मान्सून लांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणाचा मुबलक पुरवठा होत नसल्याचं समोर आलं आहे. तसेच शेतकऱ्यांसमोर देखील दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे. अशावेळी आता बळीराजासह सर्वसामान्यांचे आकाशाकडे डोळे लागून राहिले आहेत.
हे ही वाचा>> उद्धव ठाकरेंच्या बाजूच्या खुर्चीवर बसली ‘ही’ व्यक्ती, भाजपला मिळालं आयतं कोलीत!
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून लांबला असला तरी आता तो महाराष्ट्रात दाखल झाला असून पुढील आठवड्यात राज्यात दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT