बुलढाणा: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथे समृद्धी महामार्गावर (Samruddhi Express way) खाजगी बसला आज (1 जुलै) रात्री मध्यरात्री 1.30 वाजेचा सुमारस भीषण अपघात (Bus Accident)झाला. ज्यामध्ये तब्बल 25 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसला जी भीषण आग लागली. त्यामध्ये हे 25 जण अक्षरश: होरपळून निघाले. यापैकी काही मृतदेह अक्षरश: ओळखू देखील येत नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएन किटही मागविण्यात आल्या. दरम्यान आता या अपघातातील 11 मृतांची ओळख पटली आहे.
ADVERTISEMENT
समृद्धी महामार्गावरील बस अपघातातील मृतांची यादी
बुलढाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत माहिती देताना सांगितलं की, दिनांक 1 जुलै 2023 रोजी सकाळी 2.00 वाजताचे सुमारास सिंदखेड राजा तालुक्यात मौजे पिंपळखुटा शिवारात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागूपर, यवतमाळ पुणेकडे जाणारी विदर्भ ट्रॅव्हल बस क्रमांक MH-29-BE-1819 ला भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 25 व्यक्ती मयत झाल्या आहेत. त्यापैकी ओळख पटलेल्या मृत व्यक्तींची नावे खालीप्रमाणे:
ओळख पटलेल्या मृत व्यक्तींची यादी
1. कौस्तुभ काळे – नागपूर
2. कैलास गंगावणे – नागपूर
3. इंशात गुप्ता – नागपूर
4. गुडीया शेख – नागपूर
5 अवंती पोहनकर – वर्धा
6. संजीवनी गोटे – अल्लीपूर, वर्धा
7. प्रथमेश खोडे – वर्धा
8. श्रेया वंजारी – वर्धा
9. वृषाली वनकर – वर्धा
10. ओवी वनकर – वर्धा
11. शोभा वनकर – वर्धा
हे ही वाचा – ”टायर फुटलाच नाही…” RTO चा खळबळजनक रिपोर्ट, समृद्धीवर घडलं तरी काय?
बस अपघातात जखमी झालेल्यांची यादी
1. शेख दानिश शेख इस्माईल – दारव्हा, यवतमाळ (वाहन चालक)
2. संदीप मारोती राठोड – तिवसा, अमरावती (क्लिनर)
3. योगेश रामराव गवई – छत्रपती संभाजीनगर
4. साईनाथ धरमसिंग पवार – माहूर, नांदेड
5. शशिकांत रामकृष्ण गजभिये – पांढरकवडा, यवतमाळ
6. पंकज रमेशचंद्र – हिमाचल प्रदेश
दरम्यान, या जखमी प्रवाशांना उपचारासाठी देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात येऊन उपचार सुरू आहे.
हे ही वाचा – समृद्धी हायवे अपघात: ‘टायर तर नवीनच टाकलेले…’, ‘त्या’ बस मालकाने सगळंच सांगितलं!
बसची खिडकी तोडून पाच प्रवासी बाहेर आले
अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने सांगितले की, ‘माझ्या शेजारी बसलेला प्रवासी आणि मी मागील खिडकी तोडून बाहेर आलो. बसची खिडकी तोडून चार ते पाच प्रवासी बाहेर आले, मात्र इतर प्रवाशांना बाहेर पडता आले नाही, असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. अपघातानंतर लोकांनी महामार्गावरील इतर वाहनांची मदत मागितली, मात्र कोणीही थांबले नाही. पिंपळखुटा येथील या मार्गावर अनेक अपघात झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर
बुलढाणा बस दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT