Panvel: 52 वर्षीय पार्टनर घ्यायचा संशय, लिव्ह इनमधल्या महिलेने थेट…

मुंबई तक

29 Mar 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 11:45 PM)

Live in Partener End her life : लिव्ह इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने (women) तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर 52 वर्षीय महिलेच्या लिव्ह इन पार्टनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे

Live in Partener End her life

Live in Partener End her life

follow google news

Live in Partener End her life : देशात गेल्या काही वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपच्या (Live in Relation) घटना वाढल्या आहेत. या वाढत्या रिलेशनशिपमुळे गुन्ह्याच्या घटना देखील वाढल्या आहेत.अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत लिव्ह इन पार्टनरच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने (women) तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर 52 वर्षीय महिलेच्या लिव्ह इन पार्टनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.(live in parter torture women she end her life panvel shocking incident)

हे वाचलं का?

ठाण्यात एक कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relation) राहायचे. नात्यात दुरावा येऊ नये या कारणासाठी ते लिव्ह इनमध्ये राहत असल्याची माहिती आहे. लिव्ह इन मध्ये राहत असतात आरोपी व्यक्ती महिलेला (women)नेहमी टॉर्चर करायचा.सततच्या या टॉर्चरला कंटाळून महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

पार्टनरला टॉर्चर करायचा

52 वर्षाचा लिव्ह इन पार्टनर महिलेवर नेहमीच संशय घ्यायचा. महिला त्यांच्या नात्याबाबत गंभीर नव्हती.तसेच त्याला नेहमी वाटायचे तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर होते. याच कारणामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. तर आरोपी पुरूष महिलेला नेहमी टॉर्चर देखील करायच्या.या सततच्या टॉर्चरला कंटाळून महिलेने 26 मार्चला तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं तलावातून मृतदेह बाहेर काढला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.या शवविच्छेदनाच्या अहवालात काय समोर येते हे पाहावे लागणार आहे. या प्रकरणात आरोपी 52 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान लिव्ह इन रिलेशन (Live in Relation) प्रकरणात महिला आणि पुरुष एकत्र राहतात. या नात्यात अनेकदा शारीरीक भूग भागल्यानंतर नात्यात भांडणे सुरु होतात. या भांडणातून कधी नाते तूटते, तर कधी ठाण्यासारखी घटना घडते.सध्या या घटनेने ठाण्यात खळबळ माजलीय. या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत.

मुलीच्या जन्मानंतर आत्महत्या

अशीच एक आत्महत्येची घटना अकोल्यातूनही समोर आली आहे. एका महिलेने मेडिकल कॉलेजच्या टॉयलेटमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मानसिक तणावातून महिलेने आत्महत्या केल्याची माहिती आहे. या घटनेच्या दोन दिवसानंतर ही घटना उघड़कीस आली. कॉलेजचा सफाई कर्मचारी ज्यावेळेस साफसफाई करायला गेल, त्यावेळेस ही घटना उघडकीस आली. यानंतर सफाई कर्मचाऱ्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. वाशिम जिल्ह्यात राहणारी 25 वर्षाची गोदावरी खिल्लारे हीने आठवड्यापुर्वीच एका गोंडस मुलीली जन्म दिला होता. मुलीच्या जन्मानंतर सासरवाडीत सगळे नाराज होते. त्यामुळे गोदावरीने मानसिक तणावातून आत्महत्येसाऱखं टोकाचं पाऊल उचललं.

    follow whatsapp