Maharashtra SSC Result 2024 Online Result : पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल (MSBSHSE SSC Result 2024) आज (27 मे) जाहीर करण्यात आला. राज्यात सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निकालाची विभागवार आकडेवारी जाहीर करण्यात आली. तर दुपारी 1 वाजेपासून प्रत्यक्ष निकाल ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. (maharashtra board class 10th result 2024 out 10th online result declared check your marksheet here)
ADVERTISEMENT
विद्यार्थ्यांना आपला निकाल https://mahahsscboard.in/mr या लिंकद्वारे ऑनलाइन पाहता येईल. दरवर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दहावीचा निकाल जाहीर केला जातो. त्याचप्रमाणे यंदा देखील जाहीर करण्यात आला आहे. यंदा, राज्यभरातून 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. ही परीक्षा 1 मार्चपासून सुरू झाली होती आणि 26 मार्च 2024 रोजी संपली होती.
या वेबसाइट्सवर पाहता येणार दहावीचा निकाल
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
sscresult.mahahsscboard.in
results.digilocker.gov.in
मुलींचा निकाल किती टक्के? | 97.21% |
मुलांचा निकाल किती टक्के लागला? | 94.56% |
कोणत्या मंडळाचा निकाल सर्वाधिक? | कोकण (99.01%) |
कोणत्या मंडळाचा निकाल सर्वात कमी? | नागपूर (94.73%) |
महाराष्ट्राचा निकाल किती टक्के लागला? | 99.01% |
100 टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या किती? | 9,382 |
ADVERTISEMENT