Maharashtra HSC Result 2023: पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डाने बारावीचा निकाल (Maharashtra board HSC result 2021) आज (25 मे) जाहीर करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजेपासून हे निकाल ऑनलाइन पाहता येणार आहेत. दरम्यान यंदा राज्याचा एकूण निकाल हा 91.25 टक्के एवढा लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 96.09 टक्के, कला शाखेचा निकाल 84.05 टक्के आणि वाणिज्य शाखेचा निकाल 90.42 टक्के इतका लागला आहे. कोकण विभागाने विभागवार निकालात बाजी मारली आहे. तर मुंबई विभागाचा निकाल हा सर्वात कमी लागला आहे. पाहा महाराष्ट्रातील विभागवार नेमका निकाल कसा आहे. (maharashtra hsc result 2023 konkan division was the top mumbai division was at the bottom)
ADVERTISEMENT
HSC Result 2023: विभागानुसार निकाल
- कोकण – 96.01 टक्के
- पुणे – 93.34 टक्के
- कोल्हापूर – 93.28 टक्के
- अमरावती – 92.75 टक्के
- छत्रपती संभाजीनगर – 91.85 टक्के
- नाशिक – 91.66 टक्के
- लातूर – 90.37 टक्के
- नागपूर – 90.35 टक्के
- मुबंई – 88.13 टक्के
राज्यातील 9 विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के म्हणजेच सर्वाधिक लागला आहे. तर यंदा पुणे विभाग हा दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा निकाल 93.34 टक्के एवढा लागला आहे. तर मुबंई विभागाचा निकाल हा सर्वात कमी लागला आहे. ज्यामध्ये फक्त 88.13 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ADVERTISEMENT