Maharashtra Political news : प्रीतम मुंडेंना अमरसिंह पंडित बसवणार घरी?

राहुल गायकवाड

02 Jun 2023 (अपडेटेड: 02 Jun 2023, 05:26 PM)

बीडचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमरसिंह पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत. या फ्लेक्समुळे बीडमध्ये नव्या चर्चांणा उधाण आलं आहे.

Maharashtra politics news marathi : amid the discussion going about Beed Lok Sabha constituency, hoardings have been put up for Amarsingh Pandit as the future MP in beed city.

Maharashtra politics news marathi : amid the discussion going about Beed Lok Sabha constituency, hoardings have been put up for Amarsingh Pandit as the future MP in beed city.

follow google news

Political News of Maharashtra : बीडमध्ये चर्चा सुरू आहेत, ती लोकसभा निवडणुकीची! बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. त्या चर्चेला उत्तर देताना बीडच्या सध्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांनीही डिचवलं. पण, मूळ किस्सा या सगळ्यानंतर घडला, तो बीडमध्ये लागलेल्या फ्लेक्सचा. (Maharashtra political news in Marathi)

हे वाचलं का?

Latest political News Maharashtra : ‘विरोधकांना माझ्याविरोधात उमेदवार मिळत नाही’, असं म्हणत बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीला डिवचलं. त्याचबरोबर ‘तगडा उमेदवार असेल, तर लढायला आनंद वाटेल’, असा टोला देखील त्यांनी लगावला होता. असं असताना आता राष्ट्रवादी मुंडेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा >> लोकसभा नको रे बाबा! नेत्यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीसमोर नवा पेच?

बीडचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमरसिंह पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत. या फ्लेक्समुळे बीडमध्ये नव्या चर्चांणा उधाण आलं आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीकडून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे.

धनंजय मुंडेंची चर्चा असताना पंडितांचे लागले फ्लेक्स

यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत होते. परंतु मुंडे यांनी लोकसभा लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. त्यामुळे अमरसिंह पंडित यांचे नाव चर्चेत आहे. आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार म्हणून फ्सेक्स लावले आहेत.

हेही वाचा >> “…तर त्याचे खापर मोदी-शाहांवर फुटेल”, शिवसेनेचे (UBT) स्फोटक भाष्य

लोकसभेची निवडणुक वर्षभरावर आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवारांबाबत चाचपणी करण्यात येत आहे. धनंजय मुंडे हे जरी लोकसभा लढवणार नसले तरी प्रीतम मुंडेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत ते आहेत. गेल्या काही काळामध्ये बीडमध्ये राष्ट्रवादीची ताकद देखील वाढली आहे. बाजार समिती, सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची चांगली कामगिरी राहिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी जोरदार मोर्चेबांधणी करत आहे.

अमरसिंह पंडित यांचं नाव होतं आघाडीवर

2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या स्पर्धेत अमरसिंह यांचे नाव सर्वात पुढे होते. परंतु ऐनवेळी त्यांना उमेदवारीतून डावलण्यात आली. तत्कालिन जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवातीने प्रीतम मुंडे यांच्याविरोधात उमेदवारी दिली. पंडित यांनी मधल्या काळात जिल्ह्यात लक्ष दिलं. विविध मतदारसंघामध्ये त्यांचा वावर वाढल्याने त्यांनी या आधीच लोकसभेची तयारी केली आहे.

हेही वाचा >> Wrestlers Protest : 7 तक्रारी… WFI ब्रिजभूषण सिंह यांच्यावर नेमके आरोप काय?

आता अमरसिंह पंडित यांचे भावी खासदार म्हणणारे फ्लेक्स लागल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मविआच्या बैठकीमध्ये बीडची जागा कुणाला दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर प्रीतम मुंडे म्हणतात तसं तगडं आव्हान पंडित हे उभं करतात का हे येत्या काळात स्पष्ट होईल?

    follow whatsapp