पालघर, ठाणे, मुंबईत कोरडं हवामान! 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह धो धो पाऊस बरसणार

Maharashtra Weather Today :  एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानात लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Maharashtra Weather Today (फोटो- AI)

Maharashtra Weather Today (फोटो- AI)

मुंबई तक

17 Apr 2025 (अपडेटेड: 17 Apr 2025, 12:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात कोणत्या जिल्ह्यात उसळणार उष्णतेची लाट?

point

या जिल्ह्यांत कोसळणार पावसाच्या सरी

point

जाणून घ्या आजच्या हवामानाबाबत सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today:एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानात लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल बुधवारी उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर  दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील  जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, आज गुरुवारी 17 एप्रिलला संपूर्ण राज्यात कशाप्रकारचं हवामान असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

हे वाचलं का?

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कसं असेल आजचं हवामान?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज बांधण्यात आला आहे. तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर,  पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, बीडमध्ये उष्ण व दमट हवामान असणार आहे.

हे ही वाचा >> SSC And HSC Result 2025 : दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? समोर आली सर्वात मोठी अपडेट

तसच लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ हलक्या व मध्यम स्वरुपाच्या पावसासह विजांचा गडगडाट होऊ शकतो. तसच या ठिकाणी वादळी वारे (30-40 किमी वेगाने वारे) वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. 

दरम्यान काल बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, जालना, परभणी, बीड, हिंगोलीमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज आयएमडीमधून वर्तवण्यात आला होता. 

हे ही वाचा >> 22 वर्षीय तरुणीला घेऊन गेला OYO वर, गर्लफ्रेंड जोरजोरात ओरडत बाहेर पळाली! 38 वर्षांचा उमेश बाथरुममध्ये अन्...

    follow whatsapp