Maharashtra weather: राज्यात पावसाचा कहर! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना झोडपणार; IMD कडून धोक्याचा इशारा

मुंबई तक

26 Sep 2024 (अपडेटेड: 26 Sep 2024, 05:18 PM)

Mumbai Weather Forecast Today : राज्यात काल म्हणजेच बुधवारी, 25 सप्टेंबर 2024 रोजी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलंय.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपलं

point

IMD कडून 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

point

मुंबई महापालिकेचे (BMC) नागरिकांना आवाहन

Mumbai Weather Forecast Today : राज्यात काल म्हणजेच बुधवारी, 25 सप्टेंबर 2024 रोजी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलंय. अशा परिस्थितीत आज (26 सप्टेंबर) शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अशातच तुमच्या शहरात पावसाची स्थिती कशी असेल जाणून घेऊयात.    (maharashtra Weather Forecast heavy rainfall mumbai pune red alert today 26 September 2024 know IMD weather report)

हे वाचलं का?

IMD कडून 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांना IMD कडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  येथे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा : घरात ट्रॉली बॅग, सापडले 59 तुकडे! CCTV मधून मिळाला मोठा पुरावा, असं उलगडतंय महालक्ष्मीच्या हत्येचं गूढ...

त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नगर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आले आहे.
 

मुंबई महापालिकेचे (BMC) नागरिकांना आवाहन

पावसाचा हाच जोर आजही कायम राहणार आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अ‍ॅलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शाळा व कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून मुंबई महापालिकाने शहर व उपनगरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिकेने नागरिकांना केले आहे.

    follow whatsapp