Maharashtra Weather : पुण्यासह 8 जिल्ह्यांत पाऊस घालणार हैदोस! IMD कडून सतर्कतेचा इशारा

मुंबई तक

• 11:42 AM • 27 Jul 2024

Pune Mumbai Thane Weather : महाराष्ट्रातील काही भागांत पुढील 24 तासांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

पुण्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात पाऊस कसा असेल?

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम

point

पुण्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

point

मुंबईमध्येही काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज

Mumbai Maharashtra Weather Forecast : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची संततधार सुरूच असून, पुढील 24 तासांतही पाऊस धुमाकूळ घालण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यासह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईतील काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. (The IMD Issues Orange Alert many districts of Maharashtra including pune, Satara)

हे वाचलं का?

24 जुलै महाराष्ट्रातील हवामान अंदाज

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

पुण्यासह कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

भारतीय हवामान विभागाने पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांत अतिमुसळधार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हेही वाचा >> बापानेच पुसलं लेकीचं कुंकू! रस्त्यातच जावयाची हत्या 

धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

हेही वाचा >> 'स्पा'मध्ये हत्या, 'चुलबुल'नं मांडीवर 22 नावं का गोंदवलेली?

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा असेल? पहा नकाशा

 

मुंबई-ठाण्याचे हवामान कसे असेल? 

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

पावसाचा जोर ओसरणार

पुढील काही दिवसांत पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे. 28 जुलै रोजी मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत आणि विदर्भात बुलढाण्यापासून गडचिरोलीपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

    follow whatsapp