Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर वाढला! मराठवाड्याला अतिवृष्टीचा इशारा, मुंबई-पुण्यात IMD चा अंदाज काय?

मुंबई तक

02 Sep 2024 (अपडेटेड: 02 Sep 2024, 09:33 AM)

Maharashtra Weather News : यंदा राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अशावेळी आज (2 सप्टेंबर) संपूर्ण मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

 मुंबई-पुण्यात पावसाचा अंदाज काय?

point

विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

point

या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather News : यंदा राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि धरणे तुडूंब भरली आहेत. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला देखील राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अदांज हवामान विभागाने वर्तवविला आहे. अशावेळी आज (2 सप्टेंबर) संपूर्ण मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तुमच्या शहारात पावसाचा अंदाज काय असेल जाणून घेऊया. (maharashtra Weather update today marathwada IMD alert mumbai pune weather report 2 september 2024)

हे वाचलं का?

कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच आज उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा : Devendra Fadnavis : ''शिवाजी महाराजांनी सूरत लुटलीच नाही'', फडणवीसांच्या विधानानंतर पेटला वाद?

 मुंबई-पुण्यात पावसाचा अंदाज काय?

मुंबईत तुरळक ठिकाणी अधूनमधून रिमझिम पाऊस सुरूच आहे. पुण्यात मागील महिन्यात मुसळधार पाऊस झाला. पूरस्थिती निर्माण झाल्याने इथले जनजीवन विस्कळीत झाले होते. आता जरी पुण्यात पावसानं ब्रेक घेतला असला तरी घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे.


विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने आज विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.आज अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : दुसऱ्या टप्प्यात 52 लाख महिलांना मिळणार लाभ, तुमच्या बँकेत किती पैसे येणार?

या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी

आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    follow whatsapp