Mumbai News : भयंकर...आईस्क्रिमच्या कोनमध्ये माणसाचं बोट, मुंबईतील घटनेने खळबळ

मुंबई तक

13 Jun 2024 (अपडेटेड: 13 Jun 2024, 05:02 PM)

Mumbai News : एका अ‍ॅपच्या माध्यमातून तीन कोन आईस्क्रिम मागवल्या होत्या. त्यातली एक यम्मो ब्रॅन्डची बटरस्कॉच आईस्क्रिम होती. ही आईस्क्रिम अर्धी खाल्यानंतर मला मध्येच एक कठोर गोष्ट लागली. मी ती गिळणार होतोच पण ती तोंडाबाहेर काढताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली.

malad man finds human finger in ice cream case register mumbai shocking news

आईस्क्रिम खात असताना त्याच्या तोंडात अंगठ्याचा तुकडा आल्याची घटना घडली होती.

follow google news

Mumbai News : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका व्यक्तीच्या आईस्क्रिममध्ये (Ice Cream) अंगठ्याच्या तुकडा (Human Finger) सापडल्याची किळसवाणी घटना घडली आहे. तक्रारदार व्यक्तीने ऑनलाईन आईस्क्रिम मागवली होती. ही आईस्क्रिम खात असताना त्याच्या तोंडात अंगठ्याचा तुकडा आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. (malad man finds human finger in ice cream case register mumbai shocking news) 

हे वाचलं का?

पिडीत तक्रारदाने मुंबई तकला दिलेल्या माहितीनुसार, माझं नाव गेंडीन फेराव आहे. मी पेशाने एमबीबीएस डॉक्टर आहे. काल मी एका अ‍ॅपच्या माध्यमातून तीन कोन आईस्क्रिम मागवल्या होत्या. त्यातली एक यम्मो ब्रॅन्डची बटरस्कॉच आईस्क्रिम होती. ही आईस्क्रिम अर्धी खाल्यानंतर मला मध्येच एक कठोर गोष्ट लागली. मी ती गिळणार होतोच पण ती तोंडाबाहेर काढताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण आईस्क्रिममध्ये एका व्यक्तीच्या अंगठ्याचा तुकडा आढळला होता,असे तक्रारदाराने म्हटले. मी तो अंगठा फ्रिजमध्ये ठेवला होता आणि पोलिसांनाही तपासणीसाठी दिला आहे. 

हे ही वाचा : 'शाहांना सांगितलेलं शिवसेना पक्ष चिन्ह काढू नका...', राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

दरम्यान कालच्या या घटनेनंतर माझ्या तोंडातून जेवणाचा घास उतरला नाही आहे. मी हे विचार देखील करू शकत नाही, एखाद्या माणसाचं बोट आईस्क्रिममधून माझ्या तोंडात जाईल.  तसेच आईस्क्रिमच्या ज्या बॅगा आहेत, त्या किती लोकांपर्यत पोहोचल्या असतील. त्या व्यक्तीचे रक्त किती आईस्क्रिमध्ये मिसळलं असेल. कारण आम्हाला माहिती नाही त्या व्यक्तीला काय काय आजार असतील. त्याला जे आजार असतील ते इतरांना देखील होतील, त्यामुळे मी माझ्या रक्ताची चाचणी करणार असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. 

दरम्यान तरूणाने आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी यम्मो कंपनीवर आणि मालकारवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.  या घटनेने सध्या मुंबईत खळबळ माजली आहे. 

    follow whatsapp