Manoj Jarange पाटलांची CM शिंदेंकडे मोठी मागणी, अर्धा तास काय झाली चर्चा?

मुस्तफा शेख

31 Oct 2023 (अपडेटेड: 31 Oct 2023, 06:14 AM)

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Maratha Reservation : CM Eknath shinde called to manoj jarange.

Maratha Reservation : CM Eknath shinde called to manoj jarange.

follow google news

Maratha Reservation Update, Manoj Jarange-CM Eknath Shinde : मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करत मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. अन्न त्याग करत जरांगेंनी उपोषण सुरू केले असून, त्यांची प्रकृती खालावल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॉल करून चर्चा केली. यावेळी काय चर्चा झाली याबद्दल मनोज जरांगे पाटलांनी माहिती दिली.

हे वाचलं का?

अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती दिली. जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्र्यांसोबत आरक्षणाबद्दलच चर्चा झाली. त्यांना सांगितलं की, नोंदीनुसार आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही. समितीचा अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय तुम्ही घ्या.”

हे ही वाचा >> Manoj Jarange : प्रकाश आंबेडकर, बच्चू कडूंचं घेतलं नाव; जरांगे पाटील काय बोलले?

जीआरमध्ये दुरुस्ती करा

जरांगे पाटील पुढे म्हणाले, “विशेष अधिवेशन बोलवा आणि निर्णय घ्या. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, तुम्ही देऊही नका. आम्ही आमच्या अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. वकिलांशीही चर्चा करणार आहोत. ओबीसीमध्ये ८३ क्रमांकाला मराठा-कुणबी जात आहे. तो जीआर दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारित जाती निर्माण झालेल्या आहेत. शेतीच्या आधारावरच मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागेल”, अशी मागणी जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे.

हे ही वाचा >> बीडमध्ये शरद पवार गटाच्या पक्षाचं कार्यालय जाळलं! आंदोलन हिंसक वळणावर

“तुम्ही कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाही, हे त्यांना (मुख्यमंत्री शिंदे) सांगितलं. आम्हाला सरसकट प्रमाणपत्र पाहिजे. तो कायदा पारित करण्यासाठी समितीकडे भरपूर पुरावे आहेत. समितीला दर्जा द्यायचा आहे. एका पुराव्यावर होऊ शकतं. तुमच्याकडे भरपूर पुरावे आहेत, असंही त्यांना सांगितलं”, अशी माहिती जरांगे पाटलांनी दिली.

ज्यांना जात प्रमाणपत्र घ्यायचं असेल, ते घेतील

“६० ते ६५ टक्के मराठा आरक्षणात आहेत. आम्ही थोडेच राहिलेलो आहोत. त्यांना आरक्षणात घेण्यासाठी विशेष अधिवेशन घ्या. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं असेल, तर ते घेतील. जर कुणाला कुणबी प्रमाण नको असतील, तर त्यांनी घेऊन नये. गोरगरीब मराठ्यांना त्यांच्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे”, असं मुख्यमंत्र्यांना सांगत जरांगे पाटलांनी शिंदेंना विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली.

    follow whatsapp