Maratha Morcha : “अजित पवारांना एकच विनंती… फडणवीसांचा राजीनामा घ्या किंवा साथ सोडा”

भागवत हिरेकर

• 12:14 PM • 03 Sep 2023

Maratha morcha lathi charge latest news : अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांच्या सरकारमधून बाहेर पडावं, अशी मागणी आता काटेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.

police lathi charge on maratha morcha : people demanded to ajit pawar that take resign of devendra fadnavis.

police lathi charge on maratha morcha : people demanded to ajit pawar that take resign of devendra fadnavis.

follow google news

Maratha morcha lathi charge updates : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या नागरिकांवर लाठीमार करण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. आता बारामती बंद ठेवून या घटनेचा निषेध केला जाणार आहे. यातच आता काटेवाडीच्या ग्रामस्थांनी अजित पवारांकडे देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

जालना जिल्ह्यात मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ उद्या (4 सप्टेंबर) बारामती बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दोन नेत्यांचेच फोटो का झळकावले?

या आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकावण्यात आले. अजित पवारांचा फोटो मात्र यात नव्हता. याचं कारण सांगताना ग्रामस्थांनी सांगितलं की, ‘जालना येथील घटनेला सर्वस्वी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत.’

हेही वाचा >> Maratha Morcha : एकनाथ शिंदेंनी दिले आदेश, ‘या’ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

‘आम्ही काटेवाडीच्या वतीने अजित दादांना एकच विनंती करतो की, त्यांनी एकतर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ तरी सोडावी. आम्ही सकल मराठा समाज तुमच्याकडे खूप अपेक्षेने पाहत आहोत.’

यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे संघटक अमोल काटे म्हणाले, ‘जालना येथील घटनेला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. या ठिकाणी आंदोलकांवर अमानुषपणे लाठी हल्ला करून जबर मारहाण करण्यात आली.’

हेही वाचा >> Uday Kotak : क्रिकेटर होण्याचं स्वप्न भंगलं, नंतर…; अशी आहे कोटक महिंद्रा बँकेच्या जन्माची गोष्ट

‘लहान मुले, महिला यांना देखील सोडले नाही‌. आमचा पोलिसांवर रोष नाही. वरिष्ठांच्या आदेशाने हे कृत्य केले. मात्र, त्यांना आदेश देणाऱ्या वरिष्ठांविषयी आमचा राग आहे. मागील सात वर्षांमध्ये मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मोर्चे काढले मात्र कोठेही अनुचित प्रकार घडला नाही’, असे अमोल काटे यांनी सांगितले.

…म्हणून आंदोलकांवर लाठीमार

‘शांततेच्या मार्गाने सुरू असणारे हे आंदोलन दडपण्याचा सरकारने प्रयत्न का केला; कारण जालना येथे काही दिवसात शासन आपल्या दारी हा राज्य शासनाचा उपक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला अडचण नको म्हणून पोलिसी बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. येथील अनेक आंदोलकांवर तसेच युवक महिलांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हा सर्व प्रकार चीड आणणारा असून मराठा समाजाच्या भावना दुखवणार आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत’, असे अमोल काटे म्हणाले.

    follow whatsapp