Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज (20 जानेवारी) अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवालीतून पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते पुन्हा एकदा भावूक झाले. गाव सोडत असल्याने आपल्या डोळ्यात पाणी आले. आपण गाव सोडत असल्यामुळे भारवलो असल्याचे त्यांनी म्हटले. (Maratha Reservation Manoj Jarange Patil before leaving antarwali sarati for Mumbai get Emotional)
ADVERTISEMENT
तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. 26 जानेवारीला मुंबईतील गल्ली गल्लीत मराठा दिसतील. आता मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही. मी मरणास भीत नाही. समाजासाठी मी लढत राहणार. मराठ्यांनी आरक्षण घेण्यासाठी माझ्यामागे पुन्हा एकदा ताकदीने उभे राहा.’ असे आवाहन यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले.
वाचा : Crime : ‘कपडे काढले अन् उलटं टांगून…’, अनाथ आश्रमातील 21 मुलींसोबत सैतानी कृत्य!
कंठ दाटला, शनिवारी सकाळापासून दुसऱ्यांदा पाणावले डोळे…
शनिवारी (20 जानेवारी) सकाळापासून दुसऱ्यांदा त्यांच्या डोळ्यात आश्रू आले. याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘सरकार किती निष्ठूर आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाज आंदोलन करत आहे. शेकडो जण शहीद झाले आहेत. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण दिले नाही. आंदोलनाचे हे दिवस आठवून माझ्या डोळ्यात पाणी आले.’ असं सांगताना त्यांचे डोळे पाणावले. त्यानंतर दुसऱ्यांदा मुंबईला निघताना गावापासून लांब जात आहोत यामुळे भावूक होत त्यांना अश्रू अनावर झाले.
वाचा : आंतरवाली ते मुंबई… मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगेंच्या कुटुंबीयांचा सहभाग!
मी मरणास भीत नाही… आता माघार घेणार नाही
‘मराठा समाजावर आतापर्यंत प्रचंड अन्याय झाला. आरक्षण मिळत नाही, यामुळे मराठा समाजाची मुले टोकाचे पाऊल उचलत आहेत. 54 लाख लोकांच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकते. परंतु सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. यामुळे जीव गेला तरी आता माघार नाही. समाजासाठी मी सुद्धा शहीद होणार आहे. 26 जानेवारी रोजी मुंबईतील गल्ली गल्लीत मराठा समाज दिसणार आहे. मुंबईतील आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर आपण उपोषण करणार,’ असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं आहे.
ADVERTISEMENT