Imtiyaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोर्चा काढला. आदर्श नागरी पतसंस्था ठेवीदारांच्या ठेवीसाठी जलील यांनी मोर्चा काढल्यानंतर जलील आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली आहे. यावेळी सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे एक वृद्धही जखमी झाला आहे. यावेळी इम्तियाज जलील यांनी आज आदर्श नागरी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी जर मंत्र्यांनी भेट दिली नाही. तर संभाजीनगरमध्ये मंत्र्यांनी फिरुन दाखवावे असा थेट सरकारमधील मंत्र्यांना इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
ठेवीदारांच्या ठेवी बुडाल्या
आदर्श नागरी पतसंस्थेतील 50 हजारापेक्षा जास्त ठेवीदारांच्या ठेवी बुडाल्या आहेत. आदर्श नागरी पतसंस्थेचे व संचालक मंडळाच्या मालमत्ता निलामी करुन गोरगरीब, वयोवृद्ध, कष्टकरी व शेतकरी ठेवीदारांच्या हक्काचे पैसे त्यांना देण्यात याव्यात. तसेच आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या नातेवाईकांनाही 5 लाखाची तात्काळ मदत देण्यात यावी. जे ठेवीदार रुग्णालयात भरती आहेत,त्यांनाही उपचार खर्च मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे ही वाचा >> Rain Update : मुंबईसह महाराष्ट्राला पुन्हा झोडपणार, बाप्पाच्या आगमनालाच बरसणार मुसळधार
मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच मोर्चा
संभाजीनगरमध्ये आंदोलनाला परवानगी नसतानाही खासदार इम्तियाज जलील यांनी मोर्चा काढल्यामुळे त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. त्यानंतरही जलील आक्रमक होत त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक असलेल्या ठिकाणापर्यंत त्यांनी मोर्चा काढला. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला आहे. आदर्श नागरी पतसंस्थेप्रकरणी मंत्र्यांनी तात्काळ निर्णय द्यावा अन्यता मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराच जलील यांनी दिला आहे.
कायदा हातात घेतला
इम्तियाज जलील यांनी आंदोलन केले असले तरी संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक असल्याने पोलिसांनी त्यांच्या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. तरीही इम्तियाज जलील यांनी मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, परवानगी नसतानाही मोर्चा काढला कारण सर्वसामान्यांसाठी मी कायदा हातात घेतला आहे. त्यामुळे सरकारने ठेवीदारांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT