गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना सातत्यानं विरोधकांकडून डिवचलं जात असल्याचं चित्र राज्यात आहे. कधी काय झाडी काय डोंगर, तर कधी पन्नास खोके असं म्हणत विरोधक टीका करत आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. शहाजी बापू पाटील यांचा उल्लेख करत पटोलेंने सांगोलेकरांना मविआला ताकद देण्याचं आवाहन केलं. पटोलेंनी केलेल्या टीकेला नंतर शहाजी बापू पाटलांनी उत्तर दिलं. दोन्ही नेते एकमेकांबद्दल नेमकं काय म्हणाले?
ADVERTISEMENT
कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. सांगोल्यात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
हेही वाचा >> ‘खरे मर्द कोण?’, शरद पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर ‘सामना’त स्फोटक अग्रलेख
नाना पटोले काय म्हणाले?
“आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की रवींद्र धंगेकर हे मंत्री झाले पाहिजेत, पण त्यासाठी सरकार आणावं लागतं. तुम्हाला ‘काय झाडी, काय डोंगर’वाला रवींद्र धंगेकर पाहिजेत की इमानदार रवींद्र धंगेकर पाहिजे? रवींद्र धंगेकरांना मंत्री करायचं असेल तर आपलं सरकार आलं पाहिजे. का त्याला पण खोक्यावर पाठवायचं?”, असा चिमटा नाना पटोले यांनी काढला होता.
काँग्रेसकडे माणूस नसल्यानं पटोले प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांनी केलेल्या टीकेवर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, “सध्या अडचण अशी आहे की, आपल्या मानदेशी भाषेत एक म्हण आहे, ज्याला खालचं वरचं कळत नाही, त्याला कारभारी केलं. नाना पटोलेला कोळज कुठे, करगडी कुठे, नारळा कुठे, अकलूज कुठे काही माहिती आहे का? उग आपलं काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्यायला कुणी माणूस नाही म्हणून याला केलं. हे काही नाही. राजकारणातील अतिशय कमी बुद्धी असलेले सध्या दुर्दैवाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत.”
हेही वाचा >> अजितदादा नाही तर सुप्रिया सुळेंमुळे शरद पवारांनी राजीनामा घेतला मागे?
शरद पवारांनी भावनिक नातं
“मी 30-40 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबरच काम केलेलं आहे. भावनिक नातं असणं नैसर्गिक असणारच. माझा रस्ता भगव्या झेंड्याबरोबर आहे, त्याचा रस्ता तिरंगी झेंड्याबरोबर आहे. बाबूराव गायकवाड यांच्या अमृत सोहळ्याला शरद पवार इथे आले. हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. चांगला पार पडला. पवारसाहेबांना भेटल्यानंतर मला निश्चितच आनंद झाला”, असंही शहाजी बापू पाटील म्हणाले.
pa…अन् व्यासपीठावर शहाजी बापू पाटील पडले शरद पवारांच्या पाया
बाबूराव गायकवाड यांचा अमृत महोसत्सवी सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाल शरद पवार उपस्थित होते. शरद पवार व्यासपीठावर आल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांचं हस्तांदोलन करत स्वागत केलं. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील हे मात्र शरद पवारांच्या पाया पडले. आपलं आणि शरद पवारांचं भावनिक नातं असल्याची भावना त्यांनी नंतर व्यक्त केली.
ADVERTISEMENT