Mumbai Fire : गिरगावमध्ये बहुमजली इमारतीत अग्नितांडव! 2 जणांचा होरपळून मृत्यू

रोहिणी ठोंबरे

03 Dec 2023 (अपडेटेड: 03 Dec 2023, 05:22 AM)

गिरगाव परिसरात शनिवारी (02 डिसेंबर) रात्री एका इमारतीला भीषण आग (Fire Incident) लागली. गिरगाव चौपाटी परिसरात असलेल्या या निवासी इमारतीला शनिवारी रात्री 9.55 वाजता आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती.

Mumbai Fire : गिरगावमध्ये बहुमजली इमारतीत अग्नितांडव! 2 जणांचा होरपळून मृत्यू

Mumbai Fire : गिरगावमध्ये बहुमजली इमारतीत अग्नितांडव! 2 जणांचा होरपळून मृत्यू

follow google news

Mumbai News : गिरगाव (Girgaon) परिसरात शनिवारी (02 डिसेंबर) रात्री एका इमारतीला भीषण आग (Fire Incident) लागली. गिरगाव चौपाटी परिसरात असलेल्या या निवासी इमारतीला शनिवारी रात्री 9.55 वाजता आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. ग्राउंड प्लस तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Mumbai Girgaon News A fire broke out in a building 2 people died, 9 rescued)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण या भीषण अपघातात 2 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर 9 जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

वाचा: ‘मराठ्यांचं आणि ओबीसींच हा एकटाच खातो’, जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका

पोलिसांनी भीषण अपघाताबाबत दिले अपडेट!

जवळपास 2 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. डेप्युटी फायर ऑफिसर एसडी सावंत यांनी सांगितले की, ‘3 मजली इमारतीच्या वेगवेगळ्या भागातून 9 जणांची सुटका करण्यात आली आहे. यानंतर आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. आग आटोक्यात आणल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीच्या आत जाऊन शोध घेतला असता दोन जणांचे मृतदेह सापडले.

हिरेन शहा (60 वर्षे) आणि नलिनी शहा (82 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही मृतदेह जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.’

वाचा: Kalyan crime : पत्नी आणि मुलाच्या हत्येचं कारण आलं समोर, घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावले!

त्यांनी सांगितले की, ज्या 9 जणांना वाचवण्यात आले आहे त्यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस आणि अग्निशमन दल या घटनेचा तपास करणार असून, सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.

    follow whatsapp