मुंबईनजीक मीरा रोडमध्ये बकरी ईदनिमित्त (Bakra Eid 2023) दोन बकरे आणल्यावरून सोसायटीत मोठा वाद झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेपी इंफ्रा या सोसायटीत मोहसिन शेख नावाचा तरूण कुर्बानीसाठी दोन बकरे घेऊन आला होता. या घटनेची माहिती सोसायटीतील नागरीकांना मिळताच त्यांनी खाली उतरून विरोध दर्शवला होता. यावेळी सोसायटीतील नागरीकांनी हनुमान चालिसाचे पठण आणि जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेनंतर परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन परीस्थितीत नियंत्रणात आणली होती. त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (mumbai highrise society two goat brought for bakri eid citize oppose)
ADVERTISEMENT
मीरा रोडमधल्या जेपी इंफ्रा सोसायटीत राहणारा मोहसिन शेख मंगळवारी रात्री सोसायटीत दोन बकरे घेऊन आला होता. या बकऱ्यांची माहिती सोसायटीतील नागरीकांना कळताच त्यांनी खाली उतरून विरोध करायला सुरुवात केली. यावेळी नागरीकांनी सोसायटीत हनुमान चालिसाचे पठण सुरु केले होते, यासोबतच जय श्री रामच्या घोषणा देखील दिल्या. साधारण तासभर सोसायटीत हा संपूर्ण वाद सुरु होता. या घटनेमुळे परीसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. हा वाढता तणाव पाहता या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. यावेळी पोलीस बळासह घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी नागरीकांची समजूत काढत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
हे ही वाचा : Cabinet Meeting: मंत्रिमंडळांच्या बैठकीत 2 मोठे निर्णय, संपूर्ण निर्णयांची यादी एका क्लिकवर
सोसायटीत बकऱ्याच्या कुर्बानीला परवानगी नाही आहे. हा नियम सर्वासाठी एकसारखाच आहे. तसेच आम्ही देखील आमचे होळी, छठ पुजा असे सर्व सण सोसायटीच्या बाहेर साजरे करतो, असे सोसायटीतील नागरीकांचे म्हणणे आहे.
मोहसीनचे म्हणणे काय़?
सोसायटीत 200 ते 250 कुटुंबिय मुस्लिम आहेत. दरवर्षी बिल्डर आम्हाला बकरा ठेवायला जागा देत असतो. पण यावेळेस जागेअभावी बिल्डरला देता आले नाही, असे मोहसीनने सांगितले. यासोबत सोसायटीकडे बकरे ठेवण्यासाठी जागा मागितली होती. पण सोसायटीकडून कोणतीच जागा देण्यात आली नव्हती असे देखील मोहसिनने सांगितले. तसेच आम्ही कुर्बानी कधीही सोसायटीत दिली नाही. कत्तलखाना किंवा बकऱ्याच्या दुकानात आम्ही जायचो, असेही मोहसिनने स्पष्ट केले आहे.
पोलीस काय म्हणाले?
या दरम्यान पोलिसांनी नागरीकांना सांगितले की, सोसायटीत व्यक्ती बकरा घेऊन येऊ शकतो की नाही, असा नियम नाही आहे. पण नागरीकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित व्यक्तीस बकरा सोसायटी बाहेर नेण्यास सांगितले आहे. तसेच नियमानुसार सोसायटीत कुर्बानी दिली जाऊ शकत नाही. आणि आम्ही असे करायलाही देणार नाही. असे जर करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तक्रार दाखल करून त्याला अटक करू,असे आश्वासन पोलिसांना नागरीकांना दिला.
पोलिसांच्या या ग्वाहीनंतर वाद काहिसा निवळला होता.
एखाद्या फ्लॅटमध्ये व्यक्ती बकरे आणू शकत नाही असा कोणताही नियम नाही आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. नागरीकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित व्यक्तीस बकरा सोसायटी बाहेर नेण्यास सांगितला आहे. पोलिसांच्या आदेशानंतर मोहसिनने बकऱ्य़ांना सोसायटी बाहेर नेले आहे.त्यामुळे सध्यातरी हा वाद मिटला आहे.
ADVERTISEMENT