Mumbai Double Decker Bus : आता मुंबईच्या रस्त्यावरून डबल-डेकर बस गायब होतील. एकेकाळी मुंबईची ओळख म्हणून या डबल-डेकर बसेसकडे पाहिलं जायचं. ब्रिटीश काळापासून धावणाऱ्या या बसेस आता धावणार नाहीत. डिझेलवर चालणाऱ्या या डबल-डेकर बसेस आजपासून (१५ सप्टेंबर) मुंबईत पूर्णपणे बंद झाल्या आहेत. या बसेस चालवण्याचे काम बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टद्वारे (बेस्ट) पाहिले जात होते. (Mumbai’s Double Decker Buses off On roads From 15 september)
ADVERTISEMENT
बेस्टच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्या मुंबईत फक्त सात डबल-डेकर बस आहेत, त्यापैकी तीन ओपन-डेक बस आहेत. 15 सप्टेंबरपासून डबल डेकर बसेस रस्त्यावरून हटवण्यात येतील आणि 5 ऑक्टोबरपासून ओपन-डेक बसेस बंद होतील.’
या बस बंद केल्या जात आहेत कारण त्या बस डिझेलवर चालतात. डिझेल वाहनांचे आयुष्य 15 वर्षे आहे. या सात बसेसला 15 वर्षे पूर्ण होत असल्याने आता त्या काढण्यात येत आहेत.
Maratha Reservation : रात्री 12 ते पहाटे 3; मनोज जरांगेंनी उपोषण सोडण्यापूर्वी रात्रभर काय घडलं?
86 वर्षांपासून सुरू होता डबल-डेकरचा प्रवास!
मुंबईची ओळख बनलेल्या डबल-डेकर बस 86 वर्षांपासून रस्त्यावर धावत होत्या. 1937 मध्ये ब्रिटिशांनी मुंबईत पहिली डबल-डेकर बस चालवली. तेव्हापासून ते वाहतुकीचे महत्त्वाचे साधन बनले होते.
डबल-डेकर बसेसव्यतिरिक्त, ओपन-डेक डबल-डेकर बस देखील आहेत. पूर्वी यातून प्रवासीही प्रवास करत असत, मात्र नंतर त्याचे रूपांतर पर्यटक बसमध्ये करण्यात आले. ओपन डेक डबल-डेकर बसेस 5 ऑक्टोबरपासून बंद होणार आहेत.
‘या’ बसेसची जागा कोण घेणार?
90 च्या दशकाच्या सुरुवातीस, बेस्टच्या ताफ्यात सुमारे 900 डबल-डेकर बस होत्या. मात्र त्यानंतर त्यांची संख्या कमी होत गेली. डबल-डेकर बसेसचा देखभाल आणि चालवण्याचा खर्च जास्त असल्याने 2008 पासून ताफ्यात नवीन बसेसचा समावेश बंद करण्यात आला.
आता या डबल-डेकर बसेसची जागा इलेक्ट्रिक बसने घेतली जाणार आहे. या बसही डबल-डेकर असतील आणि त्यांचा रंग लाल आणि काळा असेल. तर जुन्या डबलडेकर बसेस फक्त लाल रंगाच्या होत्या.
मुलीनं आय लव्ह यू मम्मी-पप्पा लिहून जीवनयात्रा संपवली, नंतर आई-वडिलांनीच केला मोठा खुलासा
बेस्टने लवकरच पर्यटकांसाठी ओपन-डेक डबल-डेकर बस खरेदी करणार असल्याचे सांगितले होते. या देखील इलेक्ट्रिक असतील.
यंदाच्या फेब्रुवारीपासून मुंबईच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावू लागल्या आहेत. आतापर्यंत अशा 25 बसेस आहेत. या इलेक्ट्रिक बसेसची किंमत दोन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. तर डिझेल डबलडेकर बससाठी ३० ते ३५ लाख रुपये खर्च येत होता.
जुन्या डबल-डेकर बसने एकेकाळी मुंबईकरांच्या मनावर केलं होतं राज्य!
या डबल-डेकर बसेसनी मुंबईकरांच्या मनावर राज्य केलं होतं. त्यामुळेच या बसेस जपून ठेवण्याबाबत मुंबईकर बोलत आहेत. तसंच, अनिक डेपो स्थित असलेल्या संग्रहालयात किमान दोन बसेस ठेवाव्यात, असे आवाहन अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आणि बेस्टकडे केले आहे.
नवीन इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस निश्चितच आरामदायी असल्या तरी जुन्या बसेससारख्या नसल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. ‘आपली बेस्ट आपल्यासाठी’ संस्थेचे कार्यकारी सिद्धेश म्हात्रे म्हणाले, ‘मुंबईत सिंगल आणि डबल-डेकर अशा दोन्ही ट्राम चालत होत्या पण, 1964 पासून ते रस्त्यावरून गायब झाले. यातील एकही जतन केले नाही. नंतर प्रदर्शनासाठी कोलकाताहून ट्राम आणण्यात आले, पण ते ही खराब झाले. अखेर काही वर्षांपूर्वी त्याची दुरूस्ती करून बोरी बंदरमध्ये डिस्प्ले करण्यात आलं.’
म्हात्रे पुढे म्हणाले की, ‘मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे जिथे सार्वजनिक सेवेत इतक्या डबल-डेकर बसेस आहेत. त्यामुळे या हेरिटेज बसेसचे जतन व्हायला हवे. जगातील प्रत्येक मेट्रो शहरात वाहतूक संग्रहालय आहे, परंतु मुंबईत एकही नाही.’
Triple Murder : एकाच कुटुंबीतील तिघांचा चिरला गळा, नंतर लोकांनी आरोपीचं घरच पेटवलं
डबल-डेकर बसचा प्रवास कसा झाला सुरू?
200 वर्षांपूर्वी, पॅरिसमध्ये घोडागाडी चालवणाऱ्या स्टॅनिस्लास बौद्रीने अधिक प्रवासी बसण्यासाठी घोडागाडी दुमजली बनवली. 1828 मध्ये त्यांची दोन मजली घोडागाडी पॅरिसच्या रस्त्यावर धावू लागली.
दोन वर्षांनंतर, 1830 मध्ये, ब्रिटनच्या गोल्डवर्थी गर्ने आणि वॉल्टर हॅनकॉक यांनी स्टीम इंजिन असलेली बस सुरू केली. काही वर्षांनंतर जॉर्ज शिलीबीर या आणखी एका इंग्रजाने ओम्नी बस या नावाने लंडनच्या रस्त्यावर डबल-डेकर बसेस आणल्या. इंजिन-चालित डबल-डेकर बस लंडनच्या रस्त्यावर 1920 च्या दशकात प्रथमच दाखल झाल्या. मुंबईत 1937 पासून डबल डेकर बसेस धावत आहेत.
100 पेक्षा जास्त प्रवासी बसू शकतात
1937 साली मुंबईत धावलेल्या डबल-डेकर बसमध्ये एकावेळी 58 प्रवासी प्रवास करू शकत होते. तर सिंगल डेकर बसमधून केवळ ३६ प्रवासी प्रवास करू शकत होते. वाढती लोकसंख्या आणि अरुंद रस्ते लक्षात घेऊन डबल-डेकर बसेस बनवल्या जाऊ लागल्या. त्यांची लांबी 9 ते 12 मीटर आहे. यामध्ये एकावेळी 60 ते 120 प्रवासी प्रवास करू शकतात.
ADVERTISEMENT