Nashik News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते शेतकऱ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. मात्र त्याआधीच नाशिकमधील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न (Attempt intercept fleet) करत त्यांच्या ताफ्यासमोर कांदा-टोमॅटो (Onion-tomato Farmers) ओतून शेतकऱ्यांनी सरकारवर असलेला रोष व्यक्त केला. यावेळी सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी करत अजित पवार भाजपसोबत (BJP) का गेले असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
शेतकरी मेळाव्याआधीच घोषणाबाजी
नाशिकमध्ये आज शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असून शेतकऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. या शेतकरी मेळाव्यासाठी अजित पवार नाशिक दौऱ्यावर आले असतानाच जिल्ह्यातील कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी दरासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर कांदा टोमॅटो फेकण्यात आले.
हे ही वाचा >> Asian Games: चीनच्या भूमीत भारताचा इतिहास! सुवर्ण पदकांची केली लयलूट
शेतकऱ्यांचा प्रचंड तोटा
गेल्या काही दिवसांपासून कांदा आणि टोमॅटोच्या दराबाबत शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तर काही मागील महिन्यात कांदा व्यापाऱ्यांच्या संपामुळेही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे अजित पवार नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले आहे.
हे ही वाचा >> ‘बॉलीवूड’मध्ये अंडरवर्ल्डचा पैसा, महादेव बेटिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
पवारांना दाखवले काळे झेंडे
नाशिक दौऱ्यावर असलेले अजित पवार यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांनी अजित पवार यांचा ताफा आल्यानंतर काळे झेंडे दाखवत सरकारविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. अजित पवारांविरोधातही यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ADVERTISEMENT