PM Modi : '...म्हणून तिसऱ्यांदा सत्ता हवीये'; शिवाजी महाराजांचा उल्लेख करत मोदी काय बोलले?

भागवत हिरेकर

18 Feb 2024 (अपडेटेड: 18 Feb 2024, 03:11 PM)

pm modi speech in delhi at national convention : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीत भाषण.

PM modi Speech in bjp national convention

follow google news

बातम्या हायलाइट

point

मोदींनी तिसऱ्यांदा मागितली भाजपची सत्ता

point

मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केला उल्लेख

point

भाजप राष्ट्रीय अधिवेशनात मोदींचे भाषण

PM Modi Speech In marathi : भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातून आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी तिसऱ्यांदा सत्ता का हवीये, याचं कारणही सांगितलं. 

हे वाचलं का?

दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना मोदी म्हणाले, "अनेकदा लोक मला म्हणतात की, मोदीजी, तुम्ही इतकं सगळं केलं. जे मोठे संकल्प केले होते, ते पूर्ण केले. आता कशासाठी इतकी दगदग करता? 10 वर्षांचा कुठलाही डाग न लागलेला कार्यकाळ आणि 25 कोटी लोकांना गरिबीतून वर काढणे, ही सामान्य यश नाही", असे मोदी यांनी सांगितले.  

भाषणात मोदी म्हणाले, "आम्ही देशाला महाघोटाळे आणि दहशत हल्ल्यांपासून मुक्ती दिली. आम्ही गरीब आणि मध्यम वर्गीयांचं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न केला. पण, जे लोक असा विचार करतात की, खूप झालं. असा विचार करणाऱ्यांना मी एक जुना किस्सा सांगेन", असे सांगत त्यांनी एक आठवण सांगितली.  

मला एक नेता म्हणाला, आता आराम करा... -मोदी

कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी सांगितलं की, "एकदा एक मोठे नेते मला भेटले. ते मला म्हणाले की, मोदीजी पंतप्रधान होणे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही बनला आहात. तुम्ही पक्षाचे काम केले. मुख्यमंत्री म्हणूनही खूप काळ राहिलात. दुसऱ्यांदा पंतप्रधान झाला आहात. आता इतकं काम केलं आहे. आता तरी थोडा आराम करा. त्यांची ती भावना जुन्या राजकीय अनुभवांमुळे होती. पण, आपण राजकारणासाठी नाही, तर राष्ट्रनीती साठी निघालो आहोत", असे भाष्य मोदी यांनी जुना किस्सा सांगताना केले.  

मोदींनी केला छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख

भाषणात मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. ते म्हणाले, "आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा त्यांनी असा विचार नाही केला की, आता छत्रपती बनलो आहोत. सत्ता मिळाली, तर त्याचा आनंद घेऊयात. त्यांनी त्याचं मिशन सुरू ठेवलं. असंच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी स्वतःच्या सुखासाठी जगणारा माणूस नाही."

"मी तिसऱ्यांदा भाजपचं सरकार हे सत्ता भोगण्यासाठी मागत नाहीये. मी राष्ट्राचा संकल्प घेऊन निघालेला व्यक्ती आहे. जर मी माझ्या घराची काळजी केली असती, तर आज कोट्यवधी गरिबांची घरं बनवू शकलो नसतो. मी देशातील कोट्यवधी मुलांच्या भविष्यासाठी जगतोय. जागतो, झगडत राहतो", असे मोदी म्हणाले.  

"देशातील कोट्यवधी युवक, कोट्यवधी बहिणी आणि मुली, कोट्यवधी गरिबांची स्वप्ने हाच मोदींचा संकल्प आहे. या संकल्पाच्या पूर्तीसाठी आपण सगळे सेवा वृत्तीने दिवसरात्र एक करत आहोत. दहा वर्षात आपण जे मिळवलं, तो एक टप्पा आहे. ध्येयापर्यंत पोहोचण्याचा एक विश्वास आहे", असे मोदी उपस्थितांना म्हणाले.

    follow whatsapp