Lal Krishna Advani : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख (22 जानेवारी) अगदी जवळ आली आहे. दरम्यान, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू नये, असे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT
चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी प्रकृती आणि ज्येष्ठतेमुळे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहू शकणार नाहीत. दोघेही वृद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना न येण्याची विनंती करण्यात आली आहे, जी दोघांनीही मान्य केली आहे.
चंपत राय यांनी मुरली मनोहर जोशींसोबत केली चर्चा
राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “अडवाणीजींची उपस्थिती अनिवार्य आहे, परंतु त्यांचे वय लक्षात घेता आम्ही त्यांना विनंती करू की त्यांनी कृपया येऊ नये.” लालकृष्ण अडवाणींबद्दल बोलल्यानंतर चंपत राय मुरली मनोहर जोशींबद्दल म्हणाले, “मी स्वतः डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना फोनवर येऊ नका, असे सांगितले. पण, ते मी येईन असे म्हणत राहिले. मी गुरुजींना न येण्याची वारंवार विनंती करत राहिलो. तुमचे वय आणि थंडी… त्यात तुम्ही नुकताच गुडघाही बदलला आहेस.”
कल्याण सिंग यांच्याशी संबंधित घटनेचा केला उल्लेख
कल्याण सिंह यांच्याशी संबंधित एका जुन्या घटनेचा संदर्भ देत चंपत राय म्हणाले की, 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या पायाभरणीच्या वेळी कल्याण सिंह यांनी आपण नक्की येऊ असा आग्रह धरला होता. चंपत राय पुढे म्हणाले, ‘मी त्याच्या (कल्याण सिंह) मुलाला सांगितले की, हो… हो म्हणत राहा, याचा शेवटच्या दिवशी विचार केला जाईल आणि शेवटच्या दिवशी आम्ही त्यांना सांगितले की त्यांनी येण्याची गरज नाही. हे त्यांनीही मान्य केले. घरातील मोठ्यांनाही अशाच प्रकारे समजावले जाते.
हेही वाचा >> “जरांगे, डंके की चोट पे सांगतोय, त्यांची सुटका…”, गुणरत्न सदावर्तेंनी डिवचलं
चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्व तयारी लवकरात लवकर पूर्ण केली जात आहे. चंपत राय यांनी सोमवारी (18 डिसेंबर) पत्रकार परिषदेत राम मंदिरासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी सकाळी ठीक 11 वाजता रामजन्मभूमी संकुलात दाखल होतील. त्यानंतर आम्ही प्रभू रामललाच्या अभिषेकसाठी 11:30 पर्यंत पोहोचू.
पीएम मोदींशिवाय हे असणार पाहुणे
चंपत राय पुढे म्हणाले की, ‘उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 जानेवारीपासून जनतेला रामलल्लाचे दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल. मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पीएम मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आणि सर्व विश्वस्त राम मंदिराच्या प्रांगणात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय इतरही अनेक मान्यवर राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे साक्षीदार होणार आहेत.
हेही वाचा >> ऐका dawood ibrahim ची Exclusive ऑडिओ क्लिप, दाऊदने नेमकं काय मागवलं?
तीन ठिकाणी असेल राहण्याची व्यवस्था
चंपत राय यांच्या म्हणण्यानुसार, अयोध्येतील कारसेवकपुरममध्ये रात्रीच्या निवारा प्रकारात (वसतीगृह) 1000 लोकांना राहण्याची व्यवस्था असेल. याशिवाय टिनच्या डब्यात 850 जणांची राहण्याची व्यवस्था असेल. धर्मशाळा आणि इतर ठिकाणी 600 खोल्या सापडल्या आहेत. ही संख्या 1000 खोल्यांपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT