Husband Wife Fight Relationship Tips :नवरा-बायकोच्या नात्यात प्रेमासोबत एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या मतांचा आदर करणे, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात.जर या गोष्टी होतच नसतील, पती-पत्नीमध्ये संवाद होत नसेल किंवा एकमेकांना आपआपल्या समस्या सांगितल्या जात नसतील, तर नात्यांत दुरावा येतो. या दुराव्यामुळे नात्यात भांडणे होऊ लागतात. मुळात भांडणे होत असतात, मात्र दोघांनी भांडताना काही गोष्टी जरूर टाळल्या पाहिजेत. जर या गोष्टी टाळल्या नाहीत तर नातं संपुष्ठात येण्याची भिती असते. त्यामुळे या गोष्टी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊयात. (relationship tips husband wife fight you should avoid these points either relationship will be end)
ADVERTISEMENT
लग्नाचा पश्चाताप
अनेकदा नवरा-बायकोचं भांडण टोकाला पोहोचते. या भांडणातून एकमेकांबाबत अपशब्द वापरले जातात. यामध्ये नवरा-बायकोच्या भांडणात लग्न केल्याचा पश्चाताप होत असल्याचे पार्टनरला बोलले जाते. जर ही पश्चातापाची भाषा कुणीही नवरा/बायकोने केल्यास पार्टनरला खूप दु:ख होते. यामुळे तुमच्या नात्यात प्रेम तर कमी होतचं, त्याचसोबत नात्यावरचा विश्वासही उडतो. त्यामुळे भांडताना ही गोष्ट टाळली पाहिजे.
हे ही वाचा : Ujjain Rape : 12 वर्षाच्या मुलीच्या अब्रुचे तोडले लचके, रक्तबंबाळ मुलगी दारोदार फिरली, पण…
आई-वडिलांसारखी/सारखा आहेस
नवरा-बायकोच्या भांडणात अनेकदा एकमेकांच्या आई-वडिलांनाही मध्ये आणले जाते. त्याच्या संगोपणावर प्रश्न उपस्थित केले जाते. तू तुझ्या आई-वडीलांसारखा आहेस किंवा आई-वडिलांसारखी आहेस, असे वाद होतात. त्यामुळे अशाप्रकारची तुलना नात्यासाठी वाईट ठरू शकते. याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
मी तुझ्यावर प्रेम करत नाही
पती-पत्नीच्या भांडणात अनेकदा ‘मी तुझ्यावर प्रेम करत नाही’ अशी भाषा वापरली जाते. असे शब्द पार्टनरसाठी खूपच दु:खद असतात. कारण लग्नाच्या अनेक वर्षानंतर एका टप्प्यात पोहोचल्यानंतर असे शब्द वापरले जातात. यामुळे नाते संपुष्ठात येते. तुम्ही जर या टप्प्यात पोहोचला असाल तर कपल काऊन्सिलिंग अथवा थेरेपी घ्या.
‘माझं लग्न दुसऱ्याशी झालं असतं’
लग्नानंतर ज्यावेळेस पती-पत्नीमध्ये वाद होतात, त्यावेळेस अनेकदा दोघांच्या हे लग्न का झालं? आणि ‘माझं लग्न दुसऱ्याशी झालं असतं’ तर बरं झालं असतं, असे अनेकदा पार्टनरच्या मनात येते. हे मनात येणे स्वाभाविक आहे, पण ते भांडणा दरम्यान ओठावर आले तर अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे ही गोष्ट बोलणे टाळले पाहिजे.
हे ही वाचा : Viral Video : लोकलमध्ये घडले Slap War, कॉलर पकडत एकमेकांची कानशिलं केली लाल…
सर्व समस्यांचे कारण तू आहेस
भांडणात अनेकदा एकमेकांवर गंभीर आरोप केले जातात. जसे सर्व समस्यांचे कारण तु किंवा तुम्ही आहात, असे बोलले जाते. हे बोलून देखीन ना समस्या संपणार आहेत, ना नाते टीकणार आहे. त्यामुळे ही गोष्ट देखील भांडणा दरम्यान टाळली पाहिजे.
तुम्ही खुप वाईट पालक आहात
पती-पत्नीच्या भांडणात अनेकदा पार्टनरच्या पालकत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.जसे तू वाईट पालक आहेस.त्यामुळे अशाप्रकारे तुमच्या पार्टनरचा अपमान करणे नात्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे एकमेकांच्या पालकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे टाळले पाहिजे.
दरम्यान वरील काही गोष्टी आहेत, ज्या भांडणा दरम्यान टाळल्यास,नात तुटण्याची वेळ नक्कीच येणार नाही.
ADVERTISEMENT