Rohit Pawar on ED : बारामती अॅग्रो लिमिटेडकडे मालकी असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने टाच आणली आहे. ही कारवाई रोहित पवारांसाठी मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे. पण, या कारवाईनंतर लगेचच रोहित पवारांनी एक ट्विट केलं, ज्याची खूप चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
रोहित पवारांनी ईडीच्या कारवाईवर काय म्हटलं आहे?
ईडीने बारामती अॅग्रो लिमिटेडने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर रोहित पवारांनी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
रोहित पवार म्हणतात, "माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू!"
हेही वाचा >> Rohit Pawar यांना ईडीचा झटका! 161 एकर जमिनीसह कोट्यवधींची संपत्ती जप्त, प्रकरण काय?
पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे की, "माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय."
माझ्याविरोधातच कारवाई का? रोहित पवारांचा सवाल
रोहित पवारांनी कारवाईवर बोलताना म्हटले आहे की, "ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का?", असा सवाल त्यांनी केला आहे.
हेही वाचा >> मोठी बातमी... देवेंद्र फडणवीसांनी यादी आधीच जाहीर केलं नागपूरच्या उमेदवाराचं नाव
"पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही. #लडेंगे_जितेंगे", असा इशारा रोहित पवारांनी कारवाईनंतर दिला आहे.
ADVERTISEMENT