पिंपरी-चिंचवड: ‘जोपर्यंत संपूर्ण देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्य दिन (independence day) दु:खाचाही आहे. हे लक्षात घेऊन कडकडीत उपवास करायचा. मी आतापर्यंत बोलतो.. आमची स्वातंत्र्य लक्ष्मी जोधाबाईसारखी बटकी म्हणून जगणार नाही.. मान्य नाही..’ असं अत्यंत वादग्रस्त विधान संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलं आहे. ते काल (रविवार) पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलं आहे.. (sambhaji bhide controversial statement independence day black day tiranga indian national flag saffron flag)
ADVERTISEMENT
‘ऑल इंडिया &%$ कमिटी…’, भिडेंची जीभ घसरली
या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी भारताच्या तिरंग्यावरुन देखील वादग्रस्त विधान केलं आहे. ‘आपण तिरंगी झेंडाच पत्करला पाहिजे. या समितीचा निर्णय यायच्या आधीच त्यांच्या टकुरीत काय आहे ते त्यांनी सांगून टाकलं. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये म्हणजे ऑल इंडिया &%$ कमिटीमध्ये तिरंगी झेंडा पत्करला गेला. बसा बोंबलत.. का गेला? ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं आणि वंदे मातरम् म्हटलं.. ते गीतही तुमचं-आमचं राष्ट्रगीत नाही.’ असं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.
राष्ट्रगीतावर बोलतानाही संभाजी भिडेंनी सोडली पातळी..
‘स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं आणि वंदे मातरम् म्हटलं.. ते गीतही तुमचं-आमचं राष्ट्रगीत नाही. जन-गण-मन अधिनायक जय हे.. भारत भाग्यविधाता.. पंचम जॉर्ज भ$ म्हणजे ब्रिटीश साम्राज्याचा राजा जो आमच्या देशात आला 1898 साली त्याच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोरांना सुचलेलं गीत.. काय लायकीचा देश, काय लायकीचे लोक.. काय लायकीचं स्वातंत्र्य.. आणि काय झेंडावंदन..’, असं पातळी सोडणारं विधानही संभाजी भिडेंनी केलं आहे.
हे ही वाचा>> राहुल हांडोरेने पुण्यातच रचलेला दर्शना पवारच्या हत्येचा कट?, ‘त्या’ दुकानामुळे…
‘इस्लामी राज्य आमच्या देशाच्या पाठीवरती असूच शकत नाही’
’15 ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य ते आमच्या स्वातंत्र्याचं पूर्णत्व नाही. पाकिस्तान आणि बांगलादेश, इस्लामी राज्य आमच्या देशाच्या पाठीवरती असूच शकत नाही. जमत नाही.. जयंती करू नका.. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपण जगूया.. त्यांच्यासारखं जगून त्यांनी जे स्वातंत्र्य पुकारलं होतं. ते स्वातंत्र्य पूर्ण झाल्यानंतरच उपवास करणं बंद करू. हा माझा विचार ज्यांना पटतो त्यांनी हात वर करा. लागूया कामाला..’ असंही संभाजी भिडे यावेळी म्हणाले..
हे ही वाचा>> Pune, MPSC: आधी दर्शना पवारला क्रूरपणे मारलं, आता राहुल हांडोरे म्हणतो; मला…
संभाजी भिडेंवर कारवाई होणार?
आतापर्यंत संभाजी भिडेंनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. पण त्याची फारशी दखल शासनकर्त्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत त्यांना कोणत्याही कारवाईला सामोरं जावं लागलेलं नाही. मात्र, आता अगदी उघडपणे संभाजी भिडेंनी स्वातंत्रदिन, तिरंगा याविषयी वादग्रस्त विधानं केली आहे. अशावेळी आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करणार का? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT