Sambhaji Bhide Controversy : शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना गरळ ओकली आहे. ‘महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास गांधी यांचे वडील नाहीत. त्यांचे खरे वडील हे एक मुस्लीम जमीनदार आहे’, असे तारे संभाजी भिडे यांनी तोडले. अमरावती शहरात गुरूवारी (27 जुलै) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भिडेंनी हे वक्तव्य केलं असून, यावरून वाद पेटला आहे.
ADVERTISEMENT
झालं असं की, अमरावती शहरातील बडनेरा मार्गावर असलेल्या जय भारत मंगलम या ठिकाणी संभाजी भिडेंच्या सभेचं 27 जुलै रोजी रात्री आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना भिडेंनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं.
‘महात्मा गांधींचे वडील मुस्लीम’- भिडे
संभाजी भिडे म्हणाले की, “महात्मा गांधींचे जे वडील म्हटले जातात, ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधींच्या आईला पळवून घरी आणले होते.”
वाचा >> NIA : डॉक्टरची पुण्यातून घातक कृत्ये? तरुणांना लावत होता इसिसच्या नादाला!
संभाजी भिडे एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, “महात्मा गांधी यांच्या आईला पळवून आणल्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे खरे वडील नाहीत, ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. महात्मा गांधींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. माझ्याकडे याबद्दल पुरावे देखील आहे”, असं विधान भिडे यांनी केले.
वाचा >> फडणवीसांच्या नागपुरात दुहेरी हत्याकांड! व्यापाऱ्यांना गोळ्या घातल्या, जाळलं अन्…
‘अशा नेत्यांना राजकारणातून हद्दपार करा’, संभाजी भिडे काय म्हणाले?
याच कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, “जगात हिंदुस्थान एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंची कीर्ती, शौर्य अफाट आहे. सध्या हिंदू स्वतःचं कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि धर्म विसरला आहे. त्यामुळे हिंदुस्थानची, हिंदूंची अधोगती होत आहे. देशामध्ये सर्वधर्म समभावाचा उपदेश नको. असा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे लागेल”, असं विधान भिडेंनी केलं.
वाचा >> ऑफिस असो की घर, वेळीच व्हा सावध! जास्त वेळ बसल्याने ‘या’ गंभीर आजारांचा धोका
विधानसभेत उमटले पडसाद
संभाजी भिडे यांनी केलेल्या या विधानावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडेंनी विधान केले आहे. त्यामुळे त्यांना अटक करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
ADVERTISEMENT