Samrudhhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) अपघातांच्या घटना वाढतच चालल्या आहेत. या महामार्गावरील अपघातांच हे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता पुन्हा एकदा अपघाताची एक घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. विजय शेषराव मांटे (वय 48) तुषार गजानन मांटे (वय 34) आणि ओम विजय मांटे (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. समृद्धी महामार्गावरील (Samrudhhi Highway Accident) फरदापुर देवळगाव कोड नजीक रविवारी पहाटे 4 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबियांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे. (samrudhhi highway accident continue on the highway three people died from the same family)
ADVERTISEMENT
वाशिममधून लग्न समारंभ आटपून मांटे कुटुंबिय टाटा मॅजिक वाहनाने घराकडे निघाले होते. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील फरदापुर नजीक चैनल क्रमांक 283 जवळ वाहन थांबून तिघेजण लघवीसाठी उतरले होते. यावेळी मार्गावरून भरधाव जाणाऱ्या एका सिमेंट मिक्सर ट्रकने तिघांना भीषण धडक दिली. या अपघातात विजय शेषराव मांटे (वय 48) यांचा जागीच ठार झाले तर तुषार गजानन मांटे (वय 34) आणि ओम विजय मांटे (वय 20) या दोघांना मेहकर येथे नेताना मृत्यू झाला. रविवार 4 जून रोजी सकाळी 4 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. तीनही मृतक हे एकाच कुटुंबातील होते. तसेच ते देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रसचे रहिवाशी होते.
हे ही वाचा : Sangli News : नगरसेवकाकडून गोळीबार, सांगलीत रात्री काय घडलं?
लग्न उरकून ही मंडळी रात्री घरी येण्यासाठी निघाली होती. यातील काही मंडळी देऊळगाव राजा येथे पोहोचली होती व काही मंडळी मागून येत होती. विजय मांटे यांचा मुलगा ओम याचा आज एमपीएससीचा पेपर होता. तू मागून ये, मी तोपर्यंत डब्बा करते असे म्हणत आई देऊळगाव राजा पोहोचली. तर ओम मागून येत होता, दरम्यान त्यांची गाडी फरदापुर नजीक लघुशंखेसाठी थांबली होती. यावेळी गाडी जवळ बसण्याकरिता येत असताना समोरून आलेल्या सिमेंट मिक्सर वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच फरदापुर पोलीस मदत केंद्राचे पीएसआय शैलेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तिघांना मेहकर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांनाही मृत घोषित केले होते.
ADVERTISEMENT