जयंत पाटलांच्या सांगलीत ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत ठाकरे गटानंही निषेध म्हणून तडकाफडकी मोठं पाऊल टाकलं. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आपल्याला शिवसेनेचाही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे सांगलीतील महाविकास आघाडीचं राजकारण मोठं गमतीशीर आणि इंटरेस्टिग मोडवर आलं आहे. बाजार समितीच्या निवडणुकीतील पॅनेल निर्मितीचं राजकारण काय आणि जयंतरावांच्या सांगलीत ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम का झाला, तसंच भाजपविरोधात जयंतराव आणि वसंतदादा गट एकत्र येण्याचा अर्थ काय हेच समजून घ्या.
ADVERTISEMENT
सत्तांतरावर सत्तांतर सुरू आहे. नव्या बंडाची चर्चा सुरू आहे, पण काही केल्या गावकीच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ग्रामपंचायत, झेडपीची निवडणूक जाहीर होत नाही. त्याचवेळी राज्यभरात बाजार समितीची निवडणूक लागली आहे. त्यामुळे बाजार समितीलाच पुढची दिशा ठरवणारी निवडणूक म्हणून गावोगावी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कुणाची जिरवायची, कोणाला ताकद द्यायची याचे हिशोब मांडले जात आहेत.
तीन तालुक्यात असलेली बाजारपेठ
महाराष्ट्रात करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी फेमस झालेल्या जयंत पाटलांच्या सांगलीतही बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक लागलीये. सांगली बाजार समितीचं कार्यक्षेत्र मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत विस्तारलेलं आहे. जवळपास एक हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेली ही आर्थिकदृष्ट्या सक्षम बाजार समिती म्हणून ओळखली जाते.
हेही वाचा >> सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचीच केली कोंडी; पत्रात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख
हळद, बेदाणे, गूळ या प्रमुख कृषी उत्पादनाची हीच बाजारपेठ आहे. बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत खलबतं झाली. मात्र, यातून समाधानकारक तोडगा निघाला नाही. अखेर महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने आलेत.
सांगली बाजार समिती निवडणूक : 15 जागा आणि…
18 जागांसाठी लढत होत असून व्यापारी गटाच्या दोन आणि हमाल गटाची एक जागा वगळता उर्वरित 15 जागांसाठी भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. व्यापारी, हमाल गटामध्ये पक्षीय भेद टाळण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीचं पॅनेल ठरलं. मात्र अजून भाजपचं पॅनेल झालं नाही.
खासदार संजयकाका पाटील आणि विलासराव जगताप यांच्या नेतृत्वात पॅनेल निश्चितीसाठी हालचाली सुरू आहेत. पण मविआमध्ये जे जागावाटप झालंय, त्यावरूनच मोठे मतभेद चव्हाट्यावर आलेत. जतचे काँग्रेस आमदार विक्रम जगताप यांनी विशाल पाटलांच्या उपस्थितीत जागावाटप जाहीर केलं.
हेही वाचा >> खारघर दुर्घटना: महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी अद्यापही मीडियासमोर आपली बाजू का नाही मांडली?
जागावाटप झालं, पण महाविकास आघाडी म्हणजे कोण, ठाकरे गट कोण, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालाय. कवठे महांकाळमधल्या अजित घोरपडेंना दोन जागा देण्यात आल्या. ठाकरे गट म्हणून हे जागावाटप करण्यात आलं. पण यावरच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मविआत आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला. एवढंच नाही, तर आपले सर्व 18 उमेदवार मागे घेत निषेधही केला.
बाजार समिती निवडणूक : तळ्यात मळ्यात ठाकरे गटाच्या मुळावर
शिवसेनेतल्या फाटाफुटीत अजित घोरपडेंचं स्टेटस फेसबुकच्या भाषेत कॉम्पलिकेटेड आहे. घोरपडे नेमके कोणाचे याबद्दल संभ्रम आहे. घोरपडेंantचं स्टेटस गुंतागुंतीचं असलं, तर सहकारातली त्यांची ताकद कुणीही नाकारू शकत नाही. याच ताकदीच्या जोरावर ते वेळोवेळी कॉम्पलिकेटेड राहत आलेत. पण त्यांचं तळ्यात मळ्यात राहणं ठाकरे गटाच्या मुळावर आलंय. त्यामुळेच संजय विभुतेंनी घोरपडेंकडे आधी आपण ठाकरे गटात असल्याचं जाहीर करावं, अशी मागणी केलीय.
क्राईम न्यूज >> मारेकरी अतीक आणि अशरफच्या डोक्यात गोळ्या झाडताना ‘तो’ चौथा व्यक्तीही होता हजर?
आतापर्यंत आपण खरी शिवसेना कोणाची, याभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरताना बघितलं. आता या निवडणुकीच्या निमित्ताने नेमका ठाकरे गट कोणता, असा नवा मुद्दा चर्चेला आलाय. कोल्हापुरातही महाविकास आघाडीत बोलणीसाठी बोलावण्यात आलेला ठाकरे गट म्हणजे आम्ही नाही, असा दावा करण्यात आला होता. मविआतल्या याच मतभेदांबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे मतभेद मिटतील की असेच कायम राहतील, हे बघावं लागेल.
ADVERTISEMENT