Shrikant Shinde times square: न्यूयॉर्क: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस 4 फेब्रवारी रोजी अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त त्यांच्यावर विविध ठिकाणांवरुन शुभेच्छांचा वर्षावही करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे पोस्टर ठाण्यातील निवासस्थानासोबत कल्याण-डोंबिवली या त्यांच्या मतदारसंघात ठिकठिकाणी पाहायला मिळाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती. दुसरीकडे अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर देखील श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्टर झळकविण्यात आलं. (cm eknath shinde son and mp shrikant shinde banner was displayed directly on the times square of new york usa)
ADVERTISEMENT
अमेरिकेत अनेक भारतीय नागरिक हे वास्तव्य करतात. मात्र, तरीही त्यांना भारताबाबत आणि तेथील राजकारणाबाबत बरीच ओढ कायम असते. त्यामुळेच अनेकदा भारतातील राजकीय घडामोडींचे पडसाद हे अमेरिकेत देखील आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात. त्यामुळे अशाच अनिवासी भारतीयांच्या वतीने श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताचे पोस्टर हे न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकविण्यात आले.
कल्याण-डोंबिवलीतील कार्यक्रम मात्र रद्द
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण-डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर या मतदारसंघात तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे येथील अनेक कार्यक्रम श्रीकांत शिंदे यांनी रद्द केले. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात फ्रेंड्स लायब्ररी तर्फे ‘अविश्रांत श्रीकांत’ हा श्रीकांत शिंदे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आधीच आयोजित करण्यात आला होता. मात्र तो देखील गोळीबार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला.
गोळीबार प्रकरण नेमकं काय?
उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यातच आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. महेश गायकवाड हे खासदार शिंदे यांचे निकटवर्तीय होते. पोलीस ठाण्यात झालेल्या या गोळीबारानंतर खळबळ उडाली होता. महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या असून अद्यापही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT