SSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल लागणार 'या' दिवशी... कसा कराल चेक?

रोहिणी ठोंबरे

• 02:30 PM • 25 May 2024

Maharashtra SSC Board Results 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

point

विद्यार्थ्यांना कुठे पाहता येणार 10वी चा निकाल?

point

विद्यार्थ्यांना कसा पाहता येणार 10वी चा निकाल?

SSS Board Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. 'मे'च्या चौथ्या आठवड्यात निकाल लागणार आहे. तसंच निकालाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल लागेल. (ssc result 2024 maharashtra board 10th result date declared how to check know it)

हे वाचलं का?

विद्यार्थी https://mahahsscboard.in/mr या लिंकद्वारे महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल थेट पाहू शकतात. यावर्षी, राज्यभरातून 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. ही परीक्षा 1 मार्चपासून सुरू झाली होती आणि 26 मार्च 2024 रोजी संपली होती.  SSC बोर्डाची ही परीक्षा सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या दोन वेळांमध्ये घेण्यात येते.    

हेही वाचा : भाजप, काँग्रेसला इतक्या जागा मिळणार; योगेंद्र यादवांनी मांडलं सगळं गणित

गेल्या वर्षी, महाराष्ट्र SSC चा निकाल 2 जून 2023 रोजी जाहीर झाला होता. दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.83 इतकी होती. महाराष्ट्रात एकूण 15,29,096 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14,34,893 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. विभागनिहाय निकाल पाहता कोकण 98.11 टक्के घेऊन अव्वल ठरला. यंदाही कोकण बाजी मारणार की, इतर कोणता विभाग हे पाहणं मजेशीर असणार आहे.

    follow whatsapp