Gold-Silver Rate : गणेश चतुर्थी जवळ येत आहे. सणासुदीच्या या दिवसांमध्ये सोन्याला प्रचंड मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात अनेकदा सोन्याच्या भावात चढ-उतार होताना पाहायला मिळते. आता आठवड्याच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. ही घसरण किती रूपयांनी झाली आहे यावर नजर टाकूयात. (today gold-silver prices 22 august gold rate in mumbai pune for 10 gram know the details)
ADVERTISEMENT
सोन्या-चांदीचा आजचा भाव काय?
आता सणसमारंभ येऊ लागल्याने सोने खरेदीकडे लोकांची पावले वळतात. त्यामुळे आजचे सोन्याचे भाव किती हे जाणून घेऊयात. Goodreturns वेबसाईटनुसार, आज (22 ऑगस्ट) सोन्याच्या दरात पुन्हा एकदा थोडी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 330 रुपयांनी कमी झाला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 300 रुपयांनी घसरला. जागतिक तसेच देशांतर्गत घडामोडींमुळेही सोन्याच्या रोजच्या दरात चढ उतार होत असते.
हेही वाचा : Sharad Pawar: '...तर मी स्वत: आंदोलनाला उतरणार', शरद पवारांचा सरकारला थेट इशारा! नेमकं घडलं काय?
कालच्या तुलनेत (21 ऑगस्ट) आज सोन्याच्या भावात 330 रूपयांनी घसरण झाली असून 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याची किंमत 67,100 रूपयांवरून 66,800 रूपयांवर पोहोचली आहे. त्याचवेळी, चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही आहे. एक किलो चांदी 87,000 रूपयांनी विकली जात आहे.
तुमच्या शहरात 1 तोळा सोन्याचा भाव किती?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 800 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 870 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 660 रूपये आहे.
पुणे
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 800 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 870 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 660 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 800 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 870 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 660 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 830 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72, 900 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 690 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईकरांसाठी पुढील 24 तास महत्वाचे...
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT