मोठी बातमी: ऐका dawood ibrahim ची Exclusive ऑडिओ क्लिप, दाऊदने नेमकं काय मागवलं?

मुंबई तक

18 Dec 2023 (अपडेटेड: 18 Dec 2023, 04:09 PM)

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम आणि त्याचा हस्तक फारुख यांची एक ऑडिओ क्लिप ही आता समोर आली आहे. पाहा या ऑडिओमध्ये दाऊद नेमकं काय बोलत आहे.

underworld don dawood ibrahim hospitalized in pakistan karachi poisoned demand for branded number 9 shoes and mention of jeddah exclusive audio clip of dawood ibrahim

underworld don dawood ibrahim hospitalized in pakistan karachi poisoned demand for branded number 9 shoes and mention of jeddah exclusive audio clip of dawood ibrahim

follow google news

Dawood Ibrahim Audio Clip: नवी दिल्ली: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) विषबाधा झाल्याच्या बातम्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. त्याला पाकिस्तानातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दाऊद आणि त्याच्या एका साथीदाराची एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) आता समोर आली आहे. (underworld don dawood ibrahim hospitalized in pakistan karachi poisoned demand for branded number 9 shoes and mention of jeddah exclusive audio clip of dawood ibrahim)

हे वाचलं का?

ही ऑडिओ क्लिप इंडिया टुडे/आज तककडे उपलब्ध आहे, ज्यामध्ये दाऊद इब्राहिम आणि त्याचा सरदार फारुख यांचे शब्द ऐकू येतात. या ऑडिओमध्ये दाऊद त्याच्या साथीदाराला जेद्दाहहून लुई व्हिटॉन (Louis Vuitton) चे शूज आणण्यास सांगत आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये दाऊदचा गुंड त्याला प्रत्येक नमाजमध्ये त्याच्यासाठी प्रार्थना करतो असे सांगत आहे. ‘मी प्रत्येक प्रसंगी तुमच्या आनंदासाठी प्रार्थना करतो.’ यानंतर तो दाऊदला पाकिस्तानात भेटण्याच्या आपल्या प्लॅनबद्दल सांगतो आणि शुक्रवारच्या नमाजनंतर मक्केला रवाना होणार असल्याचे सांगतो. तो म्हणतो की, ‘मी उमराह करेन आणि त्यानंतर तुम्हाला भेटण्यासाठी पाकिस्तानला येईन.’

‘तो म्हणतो जेद्दाहून काही आणायचे आहे का? जर होय तर मला सांग.’ यावर दाऊद म्हणाला, ‘तू जेद्दाला जाणार का? तुला ते दुकान आठवते का, ज्या दुकानातून आपण शूज खरेदी करायचो.’ यावर फारूक म्हणतो की, ‘ते दुकान आता बंद झाले आहे. पण मला लुई व्हिटॉनचे शूज दुसऱ्या दुकानातून मिळतील.’

यावर दाऊद त्याच्या चपलांचा नंबर सांगतो आणि म्हणतो की ठीक आहे, माझ्या चपलांचा आकार 42 आणि क्रमांक 9 आहे. यानंतर तो ब्रिटन आणि युरोपियन युनियनच्या लुई व्हिटॉन शूजच्या आकारातील फरक स्पष्ट करतो.

 

17 डिसेंबरपासून दाऊद इब्राहिमला पाकिस्तानमध्ये विषप्रयोग करून रुग्णालयात दाखल केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तथापि, विश्वसनीय गुप्तचर सूत्रांनी इंडिया टुडेशी बोलताना या वृत्तांना अफवा असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा>> “आई, मी जे केलंय, ते…”, लोकसभेत घुसणाऱ्या सागरने कुटुंबीयांना काय सांगितलं?

रविवारी रात्री एका पाकिस्तानी यूट्यूबरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याच्या बातमीने जोर पकडला होता.

जगातील तिसरा मोस्ट वाँटेड दहशतवादी

12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या 12 साखळी बॉम्बस्फोटातील सर्वात मोठा आरोपी दाऊद इब्राहिम आहे. तो मुंबई सोडून दुबईला पळून गेला होता. दाऊद दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचला आणि त्यानंतर पाकिस्तानातील कराचीमध्ये त्याचा तळ बनला. 2003 मध्ये जागतिक दहशतवादी घोषित झालेला दाऊद इब्राहिम तेव्हापासून पाकिस्तानात आहे. 2011 मध्ये दाऊद इब्राहिमला जगातील तिसरा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित करण्यात आला होता.

हे ही वाचा>> Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दिलं विष? कराचीत घेतोय उपचार

मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड

1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तो मास्टरमाइंड होता. या बॉम्बस्फोटानंतर तो दुबई सोडून पाकिस्तानला गेला होता. यानंतर त्याने पाकिस्तानात आपले तळ बनवले होते. आता तो आपल्या कुटुंबासह तेथे राहतो. त्याच्यावर भारतात दहशतवादी हल्ला, खून, अपहरण, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज, शस्त्रास्त्रांची तस्करी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2003 मध्ये त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले होते. 2011 मध्ये, एफबीआय आणि फोर्ब्सच्या यादीत त्याचे जगातील तिसरे सर्वात वाँटेड फरारी गुन्हेगार म्हणून वर्णन करण्यात आलेलं.

    follow whatsapp