Maharshtra Day Wishes in Marathi: महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीसाठी 1 मे हा दिवस खूपच खास असतो. महाराष्ट्रात 1 मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदान साजरा केला जातो.
ADVERTISEMENT
खरंतर, ब्रिटीश राजवटीत जेव्हा भारत गुलामीत होता तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात हे एकच राज्य होतं. ज्याला 'बॉम्बे स्टेट' असे म्हटलं जात होतं. बॉम्बे प्रदेशात मराठी आणि गुजराती भाषिक लोकांची संख्या अधिक होती. अशा परिस्थितीत, स्वातंत्र्यानंतर मराठी आणि गुजराती भाषिक लोक आपापल्या भाषेच्या आधारावर वेगवेगळ्या राज्यांची मागणी करू लागले. भाषेच्या आधारावर वेगवेगळ्या राज्यांची स्थापना करण्याच्या लढ्याने जोर पकडला आणि 1 मे 1960 रोजी त्या काळच्या नेहरू सरकारने बॉम्बे पुनर्गठन कायदा 1960 अंतर्गत बॉम्बे राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात नावाच्या दोन स्वतंत्र राज्यांची निर्मिती करण्यात आली.
हे ही वाचा>> Maharashtra@61 : प्रिय आमुचा…असा साजरा झाला होता पहिला महाराष्ट्र दिन, हा व्हिडीओ जरुर पाहा
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही या प्रसंगी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, Whatsapp स्टिकर्स, GIF शुभेच्छा, वॉलपेपर आणि HD फोटो पाठवून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
राज्य पुनर्रचना कायदा जुलै 1956 मध्ये मंजूर करण्यात आला. या कायद्याअंतर्गत देशात अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची स्थापना करण्यात आली. त्या काळात कन्नड भाषिकांसाठी कर्नाटक, तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश, मल्याळम भाषिकांसाठी केरळ आणि तमिळ भाषिकांसाठी तामिळनाडू ही राज्ये स्थापन झाली. खरंतर, त्या काळात मराठी आणि गुजराती भाषिकांना त्यांच्या भाषेच्या आधारावर वेगळे राज्य मिळाले नाही. मात्र, अखेर 1 मे 1960 रोजी मराठी आणि गुजराती भाषिकांमधील संघर्षामुळे मुंबई राज्याचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये स्थापन झाली.
हे ही वाचा>> कामाची बातमी: फक्त 'या' 5 टिप्स फॉलो करा आणि काही मिनिटांतच चेक करा तुमचं PF बॅलेन्स
द्या महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा!
सह्याद्रीचा सिंह गर्जला...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिन 2025
Happy Maharashtra Day
महाराष्ट्र दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
ADVERTISEMENT
