Vishalgad Encroachment : दिपक सुर्यवंशी, कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं. विशाळगडपासून काही अंतरावर असलेल्या गजापूर परिसरातील काही विशिष्ट समाजाची घरं, वाहनं आणि धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली. या दरम्यान एक घर देखील पेटवण्यात आलं. पोलीसांवर देखील तलवारीने हल्ला चढवण्यात आला होता. त्यामुळे आज दिवसभर विशाळगडावर तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. (vishalgadh encroachment houses broken vehicles vandalized stone pelted religious places sambhaji raje chhatrapati runs saves vishalgad campaign)
ADVERTISEMENT
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विशाळगड किल्ला गेल्या काही वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात जखडला गेलाय. विशाळगडावर असणाऱ्या दर्ग्यामुळं या ठिकाणी पशुबळी दिले जातात. या गडावरील अतिक्रमणं हटवावीत, अशी आग्रही मागणी करत, माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली होती. त्याचाच एक भाग म्हणून, आज त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना, चलो विशाळगड अशी साद घातली होती.
हे ही वाचा : Exclusive : 'मविआ'च्या बैठकीत उडाले खटके! पवारांचे फोन, ठाकरेंचा 'नो रिस्पॉन्स'
दुसरीकडं विशाळगडावरील दर्गा परिसरातही कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत घरं, दुकानं आणि धार्मिक स्थळाला लक्ष्य केलं. त्यामध्ये काही तरूण आणि लहान मुलं जखमी झाली होती. कार्यकर्त्यांचा जमाव बेफाम आणि बेकाबू झाला होता. त्यामुळं पोलीसही हतबल झाले होते.
हे ही वाचा : Chhagan Bhujbal : 'शरद पवारांचे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेत', भुजबळांच्या विधानाने खळबळ
दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी जाऊन जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. विशाळगड अतिक्रमणमुक्ती आंदोलनाच्या निमित्तानं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 29 जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी केला. पण हा आदेश धाब्यावर बसवत, कार्यकर्त्यांनी आज हिंसक आंदोलन केलंच.
दरम्यान एका कार्यकर्त्यांनं थेट पोलिसावरच तलवारीनं वार केला. यात तो पोलीस कर्मचारी जखमी झालाय. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, पण त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी संभाजीराजे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्यासंबंधी आपण सकारात्मक आहोत, मात्र ज्या गोष्टी न्यायप्रवीष्ठ आहेत, त्याला हात न लावता, इतर अतिक्रमणाबद्दल त्वरित कारवाई करण्यात येईल. तसे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले आहेत. त्यामुळं आपण आक्रमक भूमिका घेऊ नये, असं आवाहन संभाजीराजे यांना करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT