Vishalgad Encroachment: शिवाजी महाराजांच्या विशाळगडावरचा 'तो' दर्गा कोणाचा? नेमका वाद काय?

मुंबई तक

15 Jul 2024 (अपडेटेड: 16 Jul 2024, 10:08 AM)

Vishalgad Dargah History : विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगला चर्चेत आला होता. या विशाळगडावर एक दर्गा देखील आहे? ही दर्गा नेमकी कुणाची आहे? आणि त्याचा इतिहास काय आहे? हे जाणून घेऊयात.

vishalgarh dargah history who is malik rehman case register against sambhaji raje chhatrapati

विशाळगड किल्ला अतिक्रमणाच्या विळख्यात जखडला गेलाय.

follow google news

बातम्या हायलाइट

point

विशाळगडावर एक दर्गा देखील आहे.

point

विशाळगडावरील ही दर्गा नेमकी कुणाची आहे?

point

विशाळगड किल्ला अतिक्रमणाच्या विळख्यात जखडला गेलाय.

Vishalgad Encroachment, Vishalgad Dargah History: कोल्हापूर: कोल्हापूरातील विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा रविवारी चांगलाच पेटला होता. अज्ञातांनी काल विशाळगडावरील घरं, दुकानांची आणि गाड्यांची तोडफोड केली होती. दगडफेकही करण्यात आली होती. त्यामुळे विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगला चर्चेत आला होता. या विशाळगडावर एक दर्गा देखील आहे? ही दर्गा नेमकी कुणाची आहे? आणि त्याचा इतिहास काय आहे? हे जाणून घेऊयात. (vishalgarh dargah history who is malik rehman case register against sambhaji raje chhatrapati) 

हे वाचलं का?

सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या विशाळगडावर एक दर्गा आहे. ही दर्गा मलिक रेहाणची आहे. हा मलिक रेहमान कोण आहे? हे जाणून घेऊयात. इ.स 1469 मध्ये बहामनी सुलतानाने बब्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला विशाळगड (खेळणा)  किल्ला काबीज करण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. 

हे ही वाचा : Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात, धोका देणारे सच्चे हिंदू नाहीत...', शंकराचार्यांच्या विधानाने मोठी खळबळ

सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. पुढची  61 वर्ष हाच मलिक रेहाण विशाळगडाचा किल्लेदार होता. त्याचा मृत्यूही याच ठिकाणी झाला. त्यामुळे हा दर्गा देखील याच मलिक रेहाणच्या नावाने आहे. दर्ग्यातील शिलालेखात हा उल्लेख आढळतो. जवळजवळ पावणेदोनशे वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्तांकडे होता. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले. 

नेमकं प्रकरण काय? 

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विशाळगड किल्ला  गेल्या काही वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात जखडला गेलाय. विशाळगडावर असणाऱ्या दर्ग्यामुळं या ठिकाणी पशुबळी दिले जातात. या गडावरील अतिक्रमणं हटवावीत, अशी आग्रही मागणी करत, माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली होती. त्याचाच एक भाग म्हणून, रविवारी त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना, चलो विशाळगड अशी साद घातली होती. 

दरम्यान रविवारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागलं. विशाळगडपासून काही अंतरावर असलेल्या गजापूर परिसरातील काही विशिष्ट समाजाची घरं, वाहनं आणि धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली. या दरम्यान एक घर देखील पेटवण्यात आलं. पोलीसांवर देखील तलवारीने हल्ला चढवण्यात आला होता. 

हे ही वाचा : Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा तिसऱ्या दिव्यांग प्रमाणपत्राचा 'खेळ'? Inside Story

विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे जमाव एकत्र करणे , शासकीय कामात अडथळा आणणे, बंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

    follow whatsapp