Lonavala Bhushi Dam : लग्नासाठी आले, ट्रिपचा प्लॅन ठरला अन् घात झाला Inside Story

राहुल गायकवाड

01 Jul 2024 (अपडेटेड: 01 Jul 2024, 05:08 PM)

Lonavala Bhushi Dam News : भुशी डॅमच्या परिसरात एकाच कुटुंबातील 9 ते 10 जण वाहून गेले. यात चार जणांचा मृत्यू झाला.

भूशी डॅमजवळ धबधब्यावर 9 ते 10 जण कसे वाहून गेले?

भूशी डॅम परिसरात घडलेल्या घटनेचा फोटो.

follow google news

बातम्या हायलाइट

point

लोणावळ्यातील भुशी डॅमजवळ काय घडलं?

point

भुशी डॅमजवळ दुर्दैवी घटना

point

वर्षा पर्यटन करत असतानाच काळाचा घाला

Family drowns in waterfall in Lonavala : रविवारचा दिवस होता, हडपसरच्या सय्यदनगरच्या अन्सारी कुटुंबानं पिकनिकचा प्लॅन केला. सगळ्यांना सुटी होती, मग काय भूशी डॅमवर जाण्याचा प्लॅन झाला. कुटुंबातील सगळेच 16-17 सदस्य आनंदाने वर्षा पर्यटनासाठी निघाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, भूशी डॅमच्या वरच्या भागात धबधबा पाहण्यासाठी सगळे गेले. संथ गतीने वाहणाऱ्या पाण्यात कुटुंबातील सदस्य उतरले, पण अचानक पाण्याचा जोर वाढला अन् होत्याचं नव्हतं झालं. भूशी डॅम परिसरात अन्सारी कुटुंबासोबत काय काय घडलं? (how did Family Swept in waterfall in Lonavala, Read Detail Story)

हे वाचलं का?

रविवारी अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी हडपसरमधून निघालं होतं. घरात एक लग्न होतं, त्यासाठी काही पाहुणे दुसऱ्या गावावरुन आले होते. अन्सारी कुटुंबाचा पिकनिकचा प्लॅन ठरला. लोणावळ्यातील भूशी डॅमवर जायचं, असं ठरलं. 
लोणावळ्यातील भूशी डॅमच्या पायऱ्यांवर खरंतर पर्यटक वर्षाविहारासाठी जातात. काही लोक धरणाच्या वरच्या भागात जात असल्याने अन्सारी कुटुंबाने देखील तिथे जाण्याचा निर्णय घेतला. 

भूशी डॅम परिसरात कुटुंब कसे वाहून गेले?

एका डोंगरातून धबधबा वाहत होता. धबधब्याला खरंतर पाणी कमी होतं. अन्सारी कुटुंब त्या धबधब्याच्या खाली उभं होतं. सगळ्यांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. यात चार ते नऊ वयाची बालकं देखील होती. दुपारची 12.30 ची वेळ होती. अन्सारी कुटुंबातील १० सदस्य पाण्यात उभे होते.

पुढे काय होईल याचा कोणाला अंदाज नव्हता. अचानक पाण्याचा जोर वाढला आणि अन्सारी कुटुंब अडकलं. पाण्याचा वेढा पडल्याने सगळे एकमेकांना धरून खडकावर उभे होते. पाण्याच्या बाहेर असलेले लोक त्यांना बाहेर काढण्यासाठी धावपळ करू लागले.

हेही वाचा >> पंकजा मुंडे आमदार होणार, भाजपने 'या' 5 नेत्यांना दिली उमेदवारी 

तिथे असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. झाडाची फांदी टाकून त्यांना बाहेर काढता येईल का याचा प्रयत्न सुरु झाला. दुसरीकडे ओढण्या एकमेकांना बांधून त्यांच्यापर्यंत पोहचता येईल का याचा देखील प्रयत्न झाला. 

बाजूला असलेले लोक त्यांना धीर देत होते. अन्सारी कुटुंबाला कसं वाचवता येईल याचे प्रयत्न सुरु होते. अचनाक पाण्याचा जोर वाढला. अन्सारी कुटुंबाचा तोल सुटायला लागला. बाजूचे लोक त्यांना वाचवण्याचा अथक प्रयत्न करत होते. इतक्यात पाण्याचा जोर वाढला अन् अन्सारी कुटुंब पाहता पाहता वाहून गेलं. 

क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. हसत खेळत असणारं अन्सारी कुटुंब क्षणार्धात वाहून गेलं होतं. या घटनेत अत्तापर्यंत 4 महिलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तीन मुली आणि एक महिलेचं शव सापडलं असून एका लहान मुलाचा शोध सध्या घेण्यात येत आहे.

हेही वाचा >> "मी इथे राजीनामा देतो", सुनील राऊत-नितेश राणे विधानसभेत भिडले 

दरम्यान, या घटनेनंतर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्याचबरोबर पोलिसांनी देखील अशा ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये असं आवाहन केलं आहे. 

    follow whatsapp